शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

सपाच्या सोहळ्यात संघर्षाचे दर्शन

By admin | Updated: November 6, 2016 01:02 IST

उत्तर प्रदेशातील सत्ताधारी पार्टीच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यातही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील संघर्ष दिसून आला.

लखनौ : उत्तर प्रदेशातील सत्ताधारी पार्टीच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यातही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील संघर्ष दिसून आला. शिवपाल यादव यांनी अखिलेश यांच्यावर व्यासपीठावर जाहीरपणे दुगाण्या झाडल्या. शिवपाल यांनी अखिलेशसमर्थक जावेद आबिदी यांना बोलण्यापासून रोखले.अखिलेश यादव हेच पक्षाचे भवितव्य आहे, असे वक्तव्य आबिदी यांनी भाषणाच्या सुरुवातीला केले. त्यावर संतप्त झालेल्या शिवपाल यांनी उठून त्यांना बाजूला ढकलले. ओमप्रकाश सिंग यांनी आबिदी यांच्याकडून माईक हिसकावून घेतला.शिवपाल यांनी आपल्या भाषणात अखिलेश यांचा थेट उल्लेख करून म्हटले की, ‘मी आपल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही मला हाकला अथवा अपमानित करा, मी पक्षासाठी माझे रक्त देत राहीन. मला काही मुख्यमंत्री व्हायचे नाही.’ अखिलेश उत्तरात म्हणाले की, मी कुठल्याही परीक्षेसाठी तयार आहे. (वृत्तसंस्था)ऐक्याचे आवाहन : मुलायमसिंग यादव यांनी आपल्या परिवाराच्या ऐक्याऐवजी ‘जनता परिवारा’च्या ऐक्यावर जोर दिला. त्यांनी सांगितले की, आज सपाचा स्थापना दिवस आहे. मी जनता परिवारातील सर्व मान्यवर नेत्यांना येथे उगाच बोलावलेले नाही. देशाच्या हितासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आता पुन्हा संघर्ष करायची गरज निर्माण झाली आहे. भाजपाला हाकलून लावूआम्ही बिहारमधून भाजपला हाकलून लावले. आता उत्तर प्रदेशातूनही हाकलून लावू, असे प्रतिपादन राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केले. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी समाजवादी परिवाराला एक होण्याचे आवाहन केले. शरद यादव यांनी सांगितले की, तूर्त तरी आघाडीची चर्चा नाही. मुलायमसिंग यादवच याबाबत योग्य प्रकारे सांगू शकतील. रालोदप्रमुख अजित सिंग, लोकदलाचे नेते अभय चौटाला, अ‍ॅड राम जेठमलानी हेही व्यासपीठावर होते.