शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘गोमांस’च्या संशयावरून दाम्पत्यास रेल्वेत मारहाण

By admin | Updated: January 16, 2016 02:26 IST

रेल्वेत सापडलेल्या बेवारस पिशवीत मटण आढळल्यानंतर एका दाम्पत्याला त्यांच्याजवळ गोमांस असल्याच्या संशयावरून जबर मारहाण करण्यात आल्याची घटना मध्य प्रदेशच्या हरदापासून

हरदा : रेल्वेत सापडलेल्या बेवारस पिशवीत मटण आढळल्यानंतर एका दाम्पत्याला त्यांच्याजवळ गोमांस असल्याच्या संशयावरून जबर मारहाण करण्यात आल्याची घटना मध्य प्रदेशच्या हरदापासून ३० कि.मी.वर असलेल्या खिकिया स्थानकावर १३ जानेवारीला घडली. दाम्पत्याला मारहाण करणारे लोक हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहेत.मोहम्मद हुसैन (४३) व त्यांची पत्नी नसीम बानो (३८) हे कुशीनगर एक्स्प्रेसने गोरखपूरला जात असताना गोरक्षा समितीच्या दोन सदस्यांनी त्यांचे सामान तपासण्याचा प्रयत्न केला. हुसैन यांच्याजवळच्या पिशवीत गोमांस असल्याचा या कार्यकर्त्यांचा संशय होता. हुसैन यांनी पिशवी तपासण्यास मनाई केल्यावर या दोघांना मारहाण करण्यात आली. यानंतर हुसैन यांनी नातेवाईकांना बोलावून घेतले. दरम्यान गोरक्षा समितीचे अन्य कार्यकर्तेही आले आणि दोन गटात संघर्ष उडाला. गोरक्षा समितीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी अटक केली. त्याआधी कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये बेवारस पिशवीत मटण आढळून आले होते. हे गोमांस असल्याचा संशय होता. पण ते म्हशीचे मांस असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर खंडवा स्थानकावरून रेल्वेत चढलेल्या दहा-बारा लोकांनी प्रवाशांच्या बॅग तपासण्याचा सपाटा लावला होता. (वृत्तसंस्था)