शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

दलित युवकाचा खून शिर्डीजवळील घटना : आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

By admin | Updated: May 18, 2015 01:16 IST

शिर्डी : नगर-मनमाड रोडवरील शिंगवे रुई परिसरात सागर सुभाष शेजवळ (वय २०, रा. शिर्डी) या दलित युवकाचा दगड आणि अंगावर वाहन घालून निघृर्ण खून करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. या घटनेने शिर्डी शहरात एकच खळबळ उडाली आहे. मयताच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या संशयावरून आरोपींच्या शोधासाठी विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

शिर्डी : नगर-मनमाड रोडवरील शिंगवे रुई परिसरात सागर सुभाष शेजवळ (वय २०, रा. शिर्डी) या दलित युवकाचा दगड आणि अंगावर वाहन घालून निघृर्ण खून करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. या घटनेने शिर्डी शहरात एकच खळबळ उडाली आहे. मयताच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या संशयावरून आरोपींच्या शोधासाठी विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
राहता आणि शिर्डीच्या मध्यभागी असलेल्या नगर-मनमाड रोडवरील बी. एम. शॉपी या दुकानासमोर मयत सागर आणि विशाल अशोक कोते, रुपेश वाडेकर (रा. शिर्डी ) यांच्यासह अन्य सहा-सात जणांचे वाद झाले. त्यापूर्वी सागर याला सहा-सात जणांनी एका वाहनातून उचलून आणले. याच दुकानासमोर या जमावाने सागर याला मारहाण केली. त्यानंतर त्याला शिंगवे रुई शिवारात नेण्यात आले. तेथेही बेदम मारहाण करून दगडाने ठेचले. अंगावर रिक्षासारखे वाहन घालून अमानुषपणे खून करण्यात आल्याची तक्रार मयताच्या नातेवाईकांनी शिर्डी पोलीस ठाण्यात केली आहे. दरम्यान, घटना घडली ते ठिकाण राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयताच्या नातेवाईकांनी रात्री शिर्डी पोलीस ठाण्याला वेढा घातला होता. आरोपींना अटक केल्याशिवाय सागर याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा नातेवाईंकांनी दिला आहे. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील रात्रीच शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. सागर याचा खून कशासाठी झाला, याचे कारण रात्री उशिरापर्यंत उलगडले नाही. दरम्यान बी.एम. शॉपीच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात सागरला मारहाण करतानाचे फुटेज पोलिसांना मिळाले असून त्यावरूनच पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
सागर शेजवळ याला विशाल कोते व रुपेश वाडेकर यांच्यासह सात जणांनी शिंगवे रुई शिवारात नेले. तेथे त्याच्या अंगावर दगड फेकून तसेच रिक्षा घालून त्याला ठार मारले, असा आरोप मयताचे नातेवाईक उमेश शेजवळ यांनी पोलिसांकडे केला आहे. (तालुका प्रतिनिधी)