शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राजाला टाळी न दिल्याने दादू बहुमतापासून वंचित

By admin | Updated: February 25, 2017 09:15 IST

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना नंबर 1 पक्ष ठरला असला तरी, मुंबईकरांनी सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला बहुमताचा स्पष्ट कौल दिलेला नाही.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25 - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना नंबर 1 पक्ष ठरला असला तरी, मुंबईकरांनी सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला बहुमताचा स्पष्ट कौल दिलेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेत स्वबळावर महापौर बसवण्यासाठी  शिवसेनेला तडजोड करावी लागेल किंवा पुन्हा भाजपासोबत जावे लागेल. 
 
भाजपबरोबर युती तोडल्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आघाडी केली असती तर, आज मुंबई महापालिकेत शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाले असते तसेच मनसेचा आकडा देखील वीसच्या पुढे गेला असता. काही प्रभागांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या.तिथे सेनेचे उमेदवार काहीशे मतांच्या फरकाने पडले. हीच मते मनसे उमेदवारांनी घेतली. 
 
मुंबईत 30 ते 35 जागांवर मनसे उमेदवारांची मते निर्णायक ठरली. ज्यांचा फटका शिवसेनेला बसला. 2009 लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी लाखांच्या वर घेतलेल्या मतांमुळे शिवसेना उमेदवारांचा पराभव झाला होता. आता काहीशे मतांमुळे शिवसेनेला पालिकेत बहुमतापासून वंचित रहावे लागले.  उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केला होता. पण शिवसेनेने  त्याकडे दुर्लक्ष केले. ज्याचा फटका शिवसेनेला बसला आहे.