शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सायरस मिस्त्रींनी टाटांविरोधात केल्या कॅव्हेट दाखल

By admin | Updated: October 25, 2016 19:17 IST

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर आता सायरस मिस्त्रींनी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणामध्ये रतन टाटा आणि टाटा समूह आणि टाटा ट्रस्टविरोधात चार केविएट दाखल केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25 - टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर आता सायरस मिस्त्रींनी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणामध्ये रतन टाटा आणि टाटा समूह आणि टाटा ट्रस्टविरोधात चार कॅव्हेट दाखल केल्या आहेत, असं वृत्त द फायनान्शियल एक्स्प्रेसनं दिलं आहे. सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी अध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर ते या निर्णयाविरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून काल समोर आली होती. त्यानंतर आज त्यांनी टाटा समूहाविरोधात कॅव्हेट दाखल केल्या आहेत.  

सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्समध्ये चार वर्षांहून कमी कार्यकाळ अनुभवला आहे. सायरस मिस्त्रींना पदावरून दूर केल्यानंतर याची माहिती रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे कळवली आहे. ‘टाटा’ला स्थैर्य देण्यासाठी सध्या पद स्वीकारल्याचे ते म्हणाले. 

(सायरस मिस्त्री देणार होते रतन टाटांचा बळी)

दरम्यान टाटा सन्समध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष नियुक्त करण्यासंदर्भात आज टाटा समूहाच्या विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत रतन टाटा यांची बैठक झाली. बैठकीत रतन टाटांनी सर्व सीईओंना कंपन्यांच्या कामकाजावर लक्ष्य केंद्रित करण्याचा सल्ला दिला असून, शेअर होल्डर वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्याही सूचना केल्या आहेत. टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची तुम्ही चिंता करू नका, असंही रतन टाटांनी या बैठकीत सांगितलं आहे.