शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

्रगुन्हे वार्ता

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

गुन्हे वार्ता

गुन्हे वार्ता
अजनीत घरफोडी
नागपूर :
अजनी परिसरातील सुंदरबन ले-आऊट येथील एका बंद घरातील कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व हजार रुपये रोख असा एकूण १ लाख १० हजार रुपयाचा माल चोरून नेला.
ही घटना शनिवारी दुपारी ३.४५ ते सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास नितीन पांडे (४९) यांच्या घरी घडली. पांडे हे घराला कुलूप लावून त्रिमूर्तीनगर येथील आपल्या बहिणीच्या घरी गेले होते. दरम्यान ही घटना घडली.

वृद्ध महिलेचा मृत्यू
नागपूर :
मंगळवारी येथील एक ६० वर्षीय वृद्ध महिला लकडगंज परिसरातील लाकडीपुलाजवळ पडून गंभीर जखमी झाली. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
तुळसाबाई वासनिक असे मृत महिलेचे नाव आहे. त्या मंगळवारी बौद्ध विहारजवळ राहात होत्या. शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास त्या महालकडून लाकडीपुलाकडे जात होत्या. दरमयान त्या अचानक खाली पडून जखमी झाल्या. मेयोमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. लकडगंज पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

पादचाऱ्यास कारने उडविले
नागपूर :
वर्धा रोड खापरीजवळ शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना एका ६० वर्षाच्या वृद्धाला पांढऱ्या रंगाच्या कार चालकाने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला.
सुखदेव नानवटे असे मृताचे नाव आहे. ते रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला. कार चालक धडक देऊन पळून गेला. सोनेगाव पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.