शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

नव्या बिहार विधानसभेत १४३ आमदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे

By admin | Updated: November 10, 2015 22:45 IST

नव्या २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेतील एकूण १४३ आमदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल आहेत आणि ९६ आमदार हत्या व अपहरण यासारख्या गंभीर फौजदारी गुन्ह्यांचा सामना करीत आहेत.

पाटणा : नव्या २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेतील एकूण १४३ आमदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल आहेत आणि ९६ आमदार हत्या व अपहरण यासारख्या गंभीर फौजदारी गुन्ह्यांचा सामना करीत आहेत.गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये १२ आमदारांविरुद्ध हत्येचा आरोप, २६ आमदारांविरुद्ध हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप, ९ आमदारांविरुद्ध अपहरणाचा आरोप आणि १३ आमदारांविरुद्ध खंडणी वसुलीचा आरोप आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत ८० जागा जिंकून सर्वांत मोठा बनलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या आमदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे ४९ आहे. त्याखालोखाल नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाचा क्रमांक लागतो. या पक्षाच्या ३७ नवनिर्वाचित आमदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल आहेत.२४३ सदस्यीय विधानसभेसाठी ३४५० उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर ही बाब उघड झाली. या ३४५० उमेदवारांपैकी १०३८ (३० टक्के) उमेदवारांनी आपल्याविरुद्ध दाखल असलेल्या फौजदारी गुन्ह्यांचा खुलासा केला, अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस् (एडीआर) या संस्थेने दिली.किमान ७९६ उमेदवारांनी (२३ टक्के) आपल्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, सांप्रदायिक दुफळी, अपहरण आणि महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांशी संबंधित गंभीर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची घोषणा या प्रतिज्ञापत्रांद्वारे केली आहे. भाजपाने या निवडणुकीत १५७ उमेदवार उभे केले होते. त्यांपैकी ९५ उमेदवारांनी (६१ टक्के) आपल्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, तर १०१ उमेदवार उभे करणाऱ्या संयुक्त जनता दलाच्या ५८ उमेदवारांनी (५७ टक्के) आपल्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल असल्याची कबुली दिली आहे. याशिवाय १०१ उमेदवार उभे करणाऱ्या राजदच्या ६१ (६० टक्के), ४१ उमेदवार उभे करणाऱ्या काँग्रेसच्या २३ (५६ टक्के) आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढलेल्या ११५० पैकी २५९ (२३ टक्के) उमेदवारांनी आपल्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.गंभीर फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या आमदारांमध्ये राजदच्या आमदारांची संख्या सर्वाधिक (३१) आहे, तर संयुक्त जनता दलाचे २४ उमेदवार अशा गुन्ह्यांचा सामना करीत आहेत. (वृत्तसंस्था)