शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांमध्ये अजूनही गुन्हेगारी घटक महत्वाची भुमिका का बजावतात ? न्यायाधीशांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 07:58 IST

निवडणुकांमध्ये अजूनही गुन्हेगारी घटक महत्वाची भुमिका का बजावतात ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी विचारला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १८ - निवडणुकांमध्ये अजूनही गुन्हेगारी घटक महत्वाची भुमिका का बजावतात ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी विचारला आहे. कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाने राजकारण गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले असतानादेखील  ही परिस्थिती का ? असा सवाल न्यायाधीशांनी उपस्थित केला आहे. देशातील विविध क्षेत्रांतील प्रगती या विषयावर भोपाल न्यायालयीन अकादमीमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना हा प्रश्न विचारण्यात आला आहे. 
 
न्यायाधीस एस वाय कुरेशी यांनी निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष टी एस ठाकूर यांच्याकडे याबाबत विचारणा केली. मतदान रिंगणात गुन्हेगारी घटकांना येण्यापासून रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने काय पाऊल उचलली ? याची माहिती कुरेशी यांनी ठाकूर यांच्याकडे मागितली. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग होऊ नये तसंच सत्तेत असणा-या पक्षाला कोणताही चुकीचा फायदा मिळू नये यासाठी निवडणूक आयोगाने पुर्ण प्रयत्न केले आहेत अशी माहिती माजी अध्यक्ष टी एस ठाकूर यांनी दिली आहे.
 
निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती देणा-या उमेदवारांवर कारवाई करण्यासाठी पाऊल का उचलली गेली नाहीत ?
याबाबतही न्यायाधीशांनी विचारणा केली. प्रत्येक उमेदवाराचं प्रतिज्ञापत्र तपासून पाहण्याइतकं मनुष्यबळ निवडणूक आयोगाकडे नाही आहे. निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे असणारे उमेदवार जेव्हा अशी काही माहिती देतात तेव्हा कारवाई करण्यात येते असं ठाकूर यांनी सांगितलं आहे.
 
कायद्याची बंधन असतानाही निवडणुकांमध्ये वापरण्यात येणा-या पैशांवरुनही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसंच मतदारांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप करण्यात येत असण्यावरुन काळजी व्यक्त केली आहे. लोकशाहीसाठी हा धोका असल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं आहे.