शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आधारकार्ड सक्तीने राज्यसभेत गदारोळ

By admin | Updated: July 29, 2016 02:59 IST

घरगुती वापराचा गॅस, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे मिळणारी सेवा (धान्य, रॉकेल इत्यादी) आणि पेन्शन मिळण्यासाठी आधारकार्डच्या सक्तीच्या निषेधार्थ गुरुवारी एक झालेल्या

नवी दिल्ली : घरगुती वापराचा गॅस, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे मिळणारी सेवा (धान्य, रॉकेल इत्यादी) आणि पेन्शन मिळण्यासाठी आधारकार्डच्या सक्तीच्या निषेधार्थ गुरुवारी एक झालेल्या विरोधकांमुळे राज्यसभेचे कामकाज सकाळी तीन वेळा तहकूब करावे लागले. पहिल्यांदा कामकाज दुपारपर्यंत तहकूब केले गेले, त्यानंतर १५ मिनिटांसाठी आणि विरोधकांनी सुरू केलेला गोंधळ न थांबल्यामुळे तिसऱ्यांदा २ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल आणि समाजवादी पक्षाने आधारकार्डच्या सक्तीचा मुद्दा विचारात घेण्यासाठी कामकाज थांबविण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. या विरोधकांना डावे आणि काँग्रेस पक्षानेही पाठिंबा दिला. सभापतींनी या नोटिसा फेटाळल्या. यावर नगर विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी स्पष्टीकरण दिले. त्यानुसार नागरिकांना देण्यात आलेला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (यूआयडी) किंवा आधारकार्ड सरकारी लाभ घेण्यासाठी सक्तीचे करण्यात आलेले नाही; आणि यासंदर्भातील आवश्यक त्या सूचना दिल्या गेल्या आहेत. या खुलाशाने विरोधकांचे समाधान झाले नाही व ते सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमले. तेथे त्यांनी घोषणा दिल्या व त्यामुळे सभापतींना दुपारपर्यंत कामकाज तहकूब करावे लागले.त्यानंतर सभागृह सुरू होताच नरेश अग्रवाल (सपा), डेरेक ओह्य ब्रायन (तृणमूल काँग्रेस) आणि दिलीप तिर्के (बिजू जनता दल) म्हणाले की, आम्ही नियम २६७नुसार नोटिसा दिल्या आहेत. परंतु उपसभापती पी. जे. कुरीयन यांनी त्यांना तुमच्या नोटिशींना परवानगी नाकारण्यात आल्याचे सांगितले.नायडू म्हणाले की, सदस्यांनी व्यक्त केलेली काळजी सरकारने विचारात घेतली असून आधारकार्ड सक्तीचे करण्यात आलेले नाही. गरज भासल्यास आवश्यक त्या सूचना दिल्या जातील. (लोकमत न्यूज नेटवर्क)परीक्षेसाठी ‘आधार’सक्तीगुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आधारकार्ड सक्तीचे केले आहे. ही सक्ती तत्काळ लागू करण्यात आली आहे. ही सक्ती मंडळातर्फे परीक्षा देणाऱ्यांनाच लागू आहे. खासगी आणि खुल्या मंडळाच्या परीक्षा देणाऱ्यांना यातून सूट देण्यात आली आहे.