शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचल प्रदेशमध्ये गाय तस्कराची जमावाकडून हत्या

By admin | Updated: October 17, 2015 10:09 IST

हिमाचल प्रदेशमध्ये एका कथित गाय तस्कराचाही जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

ऑनलाइन लोकमत
नाहन ( हिमाचल प्रदेश), दि. १७ - बीफ खाल्ल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशच्या दादरी येथे इखलाख या व्यक्तीला जमावाने मारहाण करून ठार मारल्याच्या घटनेवरून देशभरातील वातावरण तापलेले असतानाच हिमाचल प्रदेशमध्ये एका कथित गाय तस्कराचाही जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. 
हिमाचलमधील सिरमौर जिल्ह्यात काही नागरिक एका ट्रकमधून पाच गाई व दहा बैल नेत असताना तेथील स्थानिकांनी पाहिले असता, त्यांनी पोलिसांच्या सहाय्याने त्या ट्रकचा पाठलाग केला.  पोलिस आपल्या पाठी लागल्याचे लक्षात आल्यावर ट्रकचालकाने तो ट्रक लवासा चौकाजवळ थांबवून काही गाईंना ट्रकच्या बाहेर फेकले. मात्र त्यात एक गाय मृत्यूमुखी पडली तर इतर गाई जखमी झाल्या. हे पाहताच ट्रक तिथेच ट्रकचालक व इतर लोक जंगलात पळून गेले. मात्र पोलिस व स्थानिकांनी त्यांचा जंगलातही पाठलाग केला आणि त्यांना पकडले. स्थानिकांनी त्या तस्करांना मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. या मारहाणीत जखमी झालेल्या नोमान या २८ वर्षीय तरूणाचा रुग्णालयातील उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तो उत्तर प्रदेशमधील सहारणपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर ट्रकचालक गुलजार (२२), मोहम्मद निशू (३७) सलमान (२०) आणि गुलफाम (२४) अशी अटक करण्यात आलेल्या इतर व्यक्तींची नावे असून त्यांच्याविरोधात प्राण्यांशी क्रूरपणे वागल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
दरम्यान या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.