शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येवर न्यायालयच निर्णय घेईल

By admin | Updated: June 7, 2015 22:58 IST

अयोध्या मुद्दा कायदा आणून सोडविला जाऊ शकत नाही आणि या मुद्यावर केवळ न्यायालयच निर्णय घेईल, असे अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या दिशेने पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी विहिंप आणि काही भाजप नेत्यांनी केलेली असतानाच, अयोध्या मुद्दा कायदा आणून सोडविला जाऊ शकत नाही आणि या मुद्यावर केवळ न्यायालयच निर्णय घेईल, असे अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने स्पष्ट केले आहे.‘राम मंदिर बांधण्यासाठी संसदेत कायदा करण्यात आला पाहिजे, असे सांगितले जात आहे; परंतु हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असल्यामुळे संसदेत कायदा आणणे शक्य होणार नाही. कायद्याच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणार नाही तर न्यायालयातूनच त्याच्यावर तोडगा काढता येईल,’ असे बोर्डचे प्रवक्ते अब्दुल रहीम कुरेशी यांनी म्हटले आहे.मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा न करता राम मंदिर बांधण्याच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे, अशी मागणी भाजपचे खासदार विनय कटियार यांनी केलेली होती.कटियार यांच्यावर टीका करताना कुरेशी म्हणाले, केंद्रात सरकार स्थापन करतेवेळी बाजूला सारण्यात आल्यामुळे कटियार हे आता स्वत:कडे लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारची विधाने करीत आहेत. कटियार यांना सरकारमध्ये एखादे पद हवे आहे, असे दिसते; परंतु आम्ही अशा प्रकारच्या वक्तव्यांना फारसे महत्त्व देत नाही.मोदी सरकारला राज्यसभेत बहुमत नसल्याकारणाने अयोध्या मुद्यावर कायदा करणे शक्य होणार नाही, या केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या विधानाकडे कुरेशी यांनी लक्ष वेधले. या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी न्यायालयाबाहेर चर्चा करण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली. चर्चा कुणाशी? जे ऐकायला तयारच नाहीत त्यांच्याशी आम्ही चर्चा कशी काय करू शकतो, असा सवाल कुरेशी यांनी केला.----------------भाजपच्या राजवटीतच राम मंदिर बांधणार -साक्षी महाराजउन्नाव : आणखी चार वर्षे कायम राहणार असलेल्या केंद्रातील भाजप सरकारच्या राजवटीतच अयोध्येत राम मंदिर बांधण्यात येईल, असे जाहीर करून वादग्रस्त भाजप खासदार साक्षी महाराज यांनी आणखी एका नव्या वादाला जन्म दिला. साक्षी महाराज यांच्या या विधानावर काँग्रेससह अन्य पक्षांनी जोरदार टीका केली आहे.‘राम मंदिर भाजपच्या राजवटीत बांधणार नाही, तर मग काँग्रेसच्या राजवटीत बांधणार का? की मुलायमसिंग किंवा मायावती राममंदिर बांधणार आहेत का? राममंदिर भाजपच्याच राजवटीत बांधण्यात येईल, ही काळ्या दगडावरची रेष आहे. ते आज बांधले नाही तर उद्या किंवा परवा तरी बांधले जाईल. आम्हाला सत्तेत केवळ एक वर्ष पूर्ण झाले आहे. आणखी चार वर्षे बाकी आहेत,’ असे साक्षी महाराज म्हणाले. उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे ते पत्रकारांशी बोलत होते. (वृत्तसंस्था)