नवी दिल्ली : काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या तक्रारीवरून दिल्लीच्या न्यायालयाने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना समन्स जारी केला.
महानगर दंडाधिकारी धीरज मित्तल यांनी हा समन्स जारी करताना इराणी यांना 27 सप्टेंबरपूर्वी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले. निरुपम यांनी 2क् डिसेंबर 2क्12 रोजी इराणी यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. इराणी यांनी एका वाहिनीवरील चर्चेदरम्यान निरुपम यांच्याविरुद्ध अवमानजनक शब्दांचा वापर केला होता. (वृत्तसंस्था)