जोडबातमी: बोगस एनओसी
By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST
गोन्साल्वीस हा सांतइनेज येथील हसन खून प्रकरणातीलही प्रमुख संशयित आहे. सुपारी किलरच्या मदतीने त्याने हसनचा खून केला होता. त्यामुळे तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
जोडबातमी: बोगस एनओसी
गोन्साल्वीस हा सांतइनेज येथील हसन खून प्रकरणातीलही प्रमुख संशयित आहे. सुपारी किलरच्या मदतीने त्याने हसनचा खून केला होता. त्यामुळे तो सध्या पोलीस कोठडीत आहे.फ्रॉस्ट इंटरनॅशनलसाठी देण्यात आलेली एनओसी बोगस असल्याचे कॅप्टन ऑफ पोर्टच्या लक्षात येईपर्यंत खनिज चीनला पोहोचले होते. त्यानंतर कॅप्टन ऑफ पोर्टने खाण खात्याला पत्र लिहून हा प्रकार कळविला होता. तत्कालीन खाण संचालक अरविंद लोलयेकर यांनी केवळ फ्रॉस्ट इंटरनॅशनल कंपनीला नोटीस पाठविली होती; परंतु नंतर त्याच कंपनीला त्यांनी खनिज वाहतुकीसाठी ट्रेडिंग परवानाही देऊन टाकला होता.भावेंच्या नावावर खपविलेगोन्साल्वीस याने लाच घेऊन बोगस एनओसी बनविली. लाचेतील १० लाख त्याचेच होते. त्यात इतर कुणाचाही वाटा नव्हता. इतके करूनही हे कुकर्म मात्र खाण खात्याचे माजी भूगर्भशास्त्रज्ञ दत्तात्रय भावे (यांनी नंतर आत्महत्या केली) यांच्या नावावर खपविण्यात आले. त्यांचे नाव व त्यांच्या नावाची बोगस स्वाक्षरी त्यावर करण्यात आली. फॉरेन्सिक चाचणीत ही स्वाक्षरी भावे यांची नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचप्रमाणे ती गोन्साल्वीस याची आहे, असा निर्वाळा देण्याएवढी माहिती फॉरेन्सिकमधून निघाली नाही; कारण चाचणीसाठी पाठविण्यात आलेला नमुना हा फार लहान होता, असे अहवालात म्हटले आहे.असे झाले दहा लाखांचे डीलदिवस होता १५ नोव्हेंबर २०१०. प्रसन्न घोडगे यांनी पणजीतील एका बँकेमधील आपल्या खात्यातून १० लाख रुपये काढले. हे पैसे त्यांनी खाण खात्यातील ड्राफ्ट्समन रॉबर्ट गोन्साल्वीस याला दिले. गोन्साल्वीस याने आपण स्वत: बनविलेली खाण खात्याची बोगस एनओसी त्याच दिवशी घोडगे यांना दिली. ही एनओसी दुसर्या दिवशी म्हणजे १६ रोजी कॅप्टन ऑफ पोर्टला सादर केली आणि त्याच दिवशी खनिजवाहू बार्ज चीनला रवाना झाली.