शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी नगरसेवकाच्या कोलांटउड्या!

By admin | Updated: September 24, 2014 02:42 IST

विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसचे माझगावचे नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी स्वत:चे कार्यक्षेत्रच बदलण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई : विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसचे माझगावचे नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी स्वत:चे कार्यक्षेत्रच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. माझगावच्या बीआयटी चाळ क्रमांक ११ मध्ये राहणारे जामसुतकर आता शिवडी मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी धडपडत आहेत.दक्षिण मुंबईतील माझगावच्या बीआयटी चाळीत राहणाऱ्या जामसुतकर यांनी महापालिकेचे तिकीट मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर २०८ प्रभागातून त्यांना नगरसेवक होण्याचा मान मिळाला. मात्र नगरसेवक झाल्यानंतर आमदार होण्यासाठी या ठिकाणी आपली डाळ शिजणार नसल्याचे जामसुतकर यांच्या पुरते लक्षात आले. कारण त्यांचा प्रभाग मुंबादेवी आणि भायखळा अशा दोन विधानसभा मतदारसंघांत विभागलेला आहे. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे आमदार तळ ठोकून बसले आहेत.अशा वेळी शिवडी या कमकुवत मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी जामसुतकर यांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. मात्र त्यांच्या या प्रयत्नांमुळे काँग्रेसच्या शिवडीतील पदाधिकाऱ्यांत कमालीची नाराजी पसरली आहे. ‘कानामागून आले आणि तिखट झाले,’ अशी काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांत जामसुतकर यांच्याप्रती भावना आहे. त्यात आमदारकीसाठीही दुसऱ्या मतदारसंघात घुसखोरी करू पाहणाऱ्या जामसुतकर यांच्या काँग्रेस निष्ठेबाबतही साशंकता असल्याचे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवर जामसुतकर यांचे फोटो झळकले होते. त्यामुळे आजही जामसुतकर राष्ट्रवादीचेच काम करत असल्याचा आरोप त्या पदाधिकाऱ्याने केला आहे.मुळात निवडणूक काळात पक्षाने मतदारांसाठी वर्षभर केलेल्या कामांचा पाढा वाचून उमेदवार मते मागण्याचे काम करतात. मात्र जामसुतकर यांना शिवडीतून तिकीट दिल्यास ते स्वत:चा प्रचार सोडून मुंबादेवी आणि भायखळा मतदारसंघात काँग्रेसचा प्रचार करण्यास कितपत वेळ देतील, याबाबतही पदाधिकाऱ्यांत साशंकता आहे. याशिवाय मुंबादेवीत मनसेने प्रथमच इम्तियाज अनिस या मुस्लीम चेहऱ्याच्या रूपात उमेदवार दिला आहे. तर भायखळ्यातून चव्हाण यांचे विरोधक आणि काँग्रेसचे बंडखोर नेते रोहिदास लोखंडे हे अपक्ष निवडणूक लढत आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन या दोन्ही जागांवर काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात दोन्ही आमदारांच्या मदतीला एका स्थानिक नगरसेवकाची अनुपस्थिती धोकादायक ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)