कॉर्पोरेट व टूर कंपन्यांना बेस्ट एसी सेवा वातानुकूलित बसगाड्या भाड्याने देणार
By admin | Updated: April 18, 2015 01:43 IST
कॉर्पोरेट व टूर कंपन्यांना बेस्ट एसी सेवा
कॉर्पोरेट व टूर कंपन्यांना बेस्ट एसी सेवा वातानुकूलित बसगाड्या भाड्याने देणार
कॉर्पोरेट व टूर कंपन्यांना बेस्ट एसी सेवावातानुकूलित बसगाड्या भाड्याने देणारमुंबई : बेस्ट उपक्रमासाठी पांढरा हत्ती ठरलेल्या वातानुकूलित बसगाड्या अखेर कॉपरेर्ेट कंपन्या, खाजगी टूर कंपन्या, हॉटेल्सला भाड्याने देण्यात येणार आहे़ याबाबत संबंधित क्षेत्रातील कंपन्यांशी बेस्ट प्रशासनाची चर्चा सुरु असल्याचे, महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी आज सांगितले़बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात २८२ वातानुकूलित बसगाड्या आहेत़ खाजगी वाहनातून फिरणारे नागरिक या वातानुकूलित बस सेवाचा लाभ घेतली, असा अंदाज होता़ परंतु या बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला नाही़ त्यामुळे याउलट यातून मिळणार्या उत्पन्नापेक्षा त्यावरील देखभालीचा खर्चच अधिक आहे़ तरीही हा पांढरा हत्ती बेस्टने आतापर्यंत पोसला़ मात्र बेस्टची आर्थिक परिस्थिती वर्षागणिक बिकट होत चालली आहे़ त्यामुळे आगारांमध्ये धूळखात पडलेल्या शंभर वातानुकूलित बसगाड्या अखेर कॉपर्रेट कंपन्या, टूर ऑपरेटर्स, बडे हॉटेल व्यवस्थापन आणि शाळांना भाड्याने देण्याचा प्रस्ताव बेस्टने तयार केला आहे़ परदेशी पर्यटकांसाठी अनेक बडे हॉटेल व्यवस्थापन वातानुकूलित बसला प्राधान्य देतील़ यापैकी इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स व काही शाळांबरोबर चर्चाही झाल्याचे, महाव्यवस्थापकांनी बेस्ट समितीच्या बैठकीत आज सांगितले़ (प्रतिनिधी)चौकटउत्पन्नापेक्षा खर्च मोठावातानुकूलित बसगाड्यांना अपेक्षित प्रवाशीवर्ग न मिळाल्याने हे बसमार्ग तोट्यात आहेत़ त्यामुळे २० वातानुकूलित बसगाड्या कमी करण्याचा निर्णय २०१३ मध्ये घेण्यात आला़ पाच वर्षांचे आर्युमान पूर्ण झाल्यामुळे या बसगाड्यांमध्ये वारंवार बिघाड होत असतात़ अशा २० बसगाड्यांच्या दुरुस्तीवर बेस्ट उपक्रमाला पाच वर्षांमध्ये दोन कोटी ७८ लाख रुपये खर्च करावे लागले़