शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

CoronaVirus News: अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका कायम; विविध करांच्या वसुलीत आतापर्यंत ३१ टक्क्यांची घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 06:59 IST

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (१५ जूनपर्यंत) प्रत्यक्ष करांचा महसूल ३१ टक्क्यांनी कमी झाला असून, तो १ लाख ३७ हजार ८२५ कोटी रुपये इतका झाला आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटानंतर देशातील एकूण कर महसुलात १५ जूनपर्यंत मोठी घट झाली असून, यंदा ३१ टक्क्यांनी कर महसूल कमी जमा झाला असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. विविध कंपन्यांकडून भरण्यात येणाऱ्या आगाऊ करामध्ये (अ‍ॅडव्हान्स टॅक्स) मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याने कर महसूल कमी प्रमाणात जमा झाला आहे.चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (१५ जूनपर्यंत) प्रत्यक्ष करांचा महसूल ३१ टक्क्यांनी कमी झाला असून, तो १ लाख ३७ हजार ८२५ कोटी रुपये इतका झाला आहे. जून २०१९ या तिमाहीमध्ये देशातून एक लाख ९९ हजार ७५५ कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष करांचा महसूल जमा झाला होता, अशी माहिती प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.जून महिना अखेर संपणाºया पहिल्या तिमाहीतील दोन महिने हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये संपले. या काळात देशातील सुमारे ८० टक्के आर्थिक उलाढाली बंद राहिल्या होत्या. त्यामुळे या काळात उलाढाल बंद असल्याचा परिणाम कराचा महसूल कमी होण्यामध्ये झाला आहे.१ जूनपासून सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली असली तरी अद्याप आर्थिक घडामोडी फारशा सुरू झालेल्या नाहीत. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्था अद्यापही रांगत असल्याचे दिसत असल्याने कर भरण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. पहिल्या तिमाहीचा आगाऊ कर भरण्यासाठी १५ जून ही शेवटची मुदत असते.कंपन्यांच्या करामध्येही मोठी घटविविध घटकांनी आपले उत्पन्न लक्षात घेऊन एकदम कर न भरता तो टप्प्याटप्प्याने भरल्यास सुविधा मिळते. हे लक्षात घेऊन प्राप्तिकर खात्यातर्फे आगाऊ कर (अ‍ॅडव्हान्स टॅक्स) भरण्याची सवलत दिली जात असते. विविध कंपन्या तसेच उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती या सवलतीचा लाभ घेत असतात. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे कंपन्यांकडून भरण्यात येणाºया आगाऊ कराच्या रकमेमध्ये ७९ टक्के एवढी मोठी घट झाली आहे. यामुळे कर महसूल जमा होण्यात अडचण निर्माण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTaxकर