समन्वय समितीतही मित्र पक्षांना डावलले
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
मुंबई- भाजपा- शिवसेना यांच्यातील समन्वय समितीमध्ये रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम यांचा समावेश केला जाणार नसल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. भाजपा व शिवसेनेने आपापल्या मित्रपक्षांची काळजी घ्यावी, असे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे मत असल्याचे समजते. बुधवारी समन्वय समितीची पहिली बैठक अपेक्षित असल्याचे समजते.
समन्वय समितीतही मित्र पक्षांना डावलले
मुंबई- भाजपा- शिवसेना यांच्यातील समन्वय समितीमध्ये रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम यांचा समावेश केला जाणार नसल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. भाजपा व शिवसेनेने आपापल्या मित्रपक्षांची काळजी घ्यावी, असे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे मत असल्याचे समजते. बुधवारी समन्वय समितीची पहिली बैठक अपेक्षित असल्याचे समजते.भाजपा व शिवसेनेतील मतभेद वरचेवर विकोपाला जाऊ लागल्याने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. मात्र या समितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम यांचा समावेश करण्यास भाजपा व शिवसेनेचे नेते फारसे अनुकूल नाहीत. मित्रपक्षांना समन्वय समितीत घेण्यापेक्षा भाजपा व शिवसेनेने त्यांच्या वाट्याला येणारी महामंडळे, नियुक्त्यांमध्ये मित्रपक्षांना सहभागी करून घ्यावे. मित्रपक्षांना समितीत घेतल्यास वेगवेगळ्या नेत्यांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे समन्वय समितीच्या कामकाजास फाटे फुटतील आणि वाद निर्माण होतील, अशी भीती भाजपा नेत्यांना वाटते.दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई यांनी मंगळवारी सायंकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली व समन्वय समितीच्या कामकाजाबाबत प्राथमिक चर्चा केली. याबाबत दानवे यांना विचारले असता ते म्हणाले की, बुधवारी समन्वय समिती घेण्याबाबत आमचा विचार सुरु आहे. या बैठकीला मित्र पक्षांना बोलवायचे किंवा कसे याबाबत चर्चा सुरु आहे. (विशेष प्रतिनिधी)