शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

ऐपत असलेल्यांनी स्वत:हून गॅस अनुदान घेणे बंद करावे

By admin | Updated: January 11, 2015 00:36 IST

ज्यांची ऐपत आहे अशा ग्राहकांनी स्वत:हून अनुदान घेणे बंद करून बाजारभावाने गॅस सिलिंडर घ्यावेत, असे आवाहन सरकारने केले आहे.

नवी दिल्ली : स्वयंपाकाच्या गॅसवर (एलपीजी) सरसकट सर्वांनाच अनुदान देण्यावर होणारा मोठा खर्च कमी करण्याचा मार्ग म्हणून ज्यांची ऐपत आहे अशा ग्राहकांनी स्वत:हून अनुदान घेणे बंद करून बाजारभावाने गॅस सिलिंडर घ्यावेत, असे आवाहन सरकारने केले आहे.समाजातील प्रतिष्ठित लोकांनी असे केले की इतरांनाही प्रोत्साहन मिळेल हे लक्षात घेऊन तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान दररोज एका ‘व्हीआयपी’ला स्वत: फोन करून त्यांना अनुदानित गॅस सिलिंडर घेणे बंद करण्याची विनंती करीत आहेत.स्वत: प्रधान यांनी मंत्री झाल्यावर लगेच अनुदान न घेण्याचा पर्याय निवडून बाजारभावाने गॅस घेण्यास सुरुवात केली आहे. तेलमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही यापुढे अनुदानित सिंलिडर न घेण्याचे शनिवारी ठरविले. ऊजार्मंत्री पियुष गोयल यांनीही गॅसचे अनुदान घेणे बंद केल्याचे शनिवारी टिष्ट्वटरवर जाहीर केले. अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनीही त्यांचे अनुकरण केले आहे.ज्यांची बाजारभावाने एलपीजी सिलिंडर घेण्याची ऐपत आहे अशा श्रीमंत व धनिकांनी स्वत:हून अनुदानित गॅसची जोडणी परत करून समाजापुढे आदर्श घालून द्यावा, असे आपल्याला मनापासून वाटते. त्यानुसार मी दररोज एका व्हीआयपी व्यक्तीला स्वत: फोन करून गॅसचे अनुदान न घेण्याचे त्यांना आवाहन करीत आहे. शनिवारी मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना फोन करून अशी विनंती केली, असे प्रधान म्हणाले.सर्व खासदार, आमदार, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या बड्या अधिकाऱ्यांनी स्वत:हून अनुदानाचा त्याग करून इतरांनाही तसे करण्यास प्रवृत्त करावे, असे आग्रही प्रतिपादन तेलमंत्र्यांनी केले. याशिवाय अनुदान फक्त पात्र लाभार्थींनाच मिळावे व त्याचा अपव्यय टळावा यासाठी अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यााची ‘पहल’ नावाची योजनाही सरकारने सुरु केली आहे. एकूण १५.५ कोटी गॅसधारकांपैकी ७.६३ कोटी ग्राहक गेल्या १५ नोव्हेंबरपासून या योजनेत सहभागी झाले असून दररोज सुमारे एक टक्का नवे ग्राहक योजनेत जोडून घेतले जात आहेत, असे प्रधान म्हणाले. येत्या दोन महिन्यांत ७० ते ७५ टक्के ग्राहकांना थेट अनुदानाची सोय उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे, असेही तेलमंत्र्यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)देशभरात स्वयंपाकाच्या गॅसचे १५ कोटी ५० लाख ग्राहक आहेत.प्रत्येक ग्राहकास वर्षाला १४.२ किग्रॅ वजनाचे १२ किंवा पाच किलो वजनाचे ३४ सिलिंडर अनुदानित दराने मिळतात.१४.२ किलोच्या प्रत्येक सिलिंडरसाठी ५६८ रुपये अनुदान सरकार देते.अनुदानाचा एकूण वार्षिक बोजा ४६, ४५८ कोटी रुपये.‘पहल‘योजनेत सामिल झालात तर १२ पर्यंत प्रत्येक सिलिंडरचे बुकिंग केल्यावर ५६८ रुपये थेट बँक खात्यात जमा होतील.घरी सिलिंडर घेऊन येणाऱ्यास बाजारभावाप्रमाणे पैसे द्यावे लागतील.