शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजियम पद्धतीत घटनादुरुस्तीचे विधेयक लोकसभेत मंजूर

By admin | Updated: August 13, 2014 15:37 IST

न्यायाधीशांच्या नियुक्तीची कॉलेजियम पद्धत रद्द बातल करणारे विधेयक लोकसभेमध्ये बहुमताने बुधवारी मंजूर करण्यात आले आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. १३ - न्यायाधीशांच्या नियुक्तीची कॉलेजियम पद्धत रद्द बातल करणारे विधेयक लोकसभेमध्ये बुधवारी बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्याने सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील न्यायाधीशांच्या नियुक्तीचे अधिकार न्यायिक निवड आयोगाला मिळणार आहेत. या आयोगात सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टातील दोन वरिष्ठ न्यायाधीश, कायदामंत्री आणि दोन प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश असणार आहे.

न्यायाधीशांच्या नेमणूकीसाठी कॉलेजियम प्रणाली बरखास्त करुन त्याऐवजी न्यायिक निवड आयोगाची स्थापना करण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक बुधवारी मंजूरीसाठी लोकसभेत मांडण्यात आले. लोकसभेत दुपारी या विधेयकावर मतदान घेण्यात आले. यात तब्बल ३६८ मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आले. सध्या न्यायाधीशांची नियुक्ती ही न्यायाधीशांकडून केली जात होती. यात हायकोर्टातील तीन तर सुप्रीम कोर्टातील पाच न्यायाधीशांचे 'कॉलेजियम' आहे. हे कॉलेजियम आता बरखास्त केले जाईल. याऐवजी आता न्यायिक निवड आयोग सुप्रीम कोर्ट व हायकोर्टातील न्यायाधीशांची निवड करणार आहे.