शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडमध्ये काँग्रेसच

By admin | Updated: May 11, 2016 04:27 IST

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षा काँग्रेसचे हरीश रावत यांच्या नेतृत्वातील सरकारने जिंकली असून, केंद्रातील मोदी सरकारला ही जोरदार चपराक असल्याचे मानले जाते

डेहराडून : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षा काँग्रेसचे हरीश रावत यांच्या नेतृत्वातील सरकारने जिंकली असून, केंद्रातील मोदी सरकारला ही जोरदार चपराक असल्याचे मानले जाते. मात्र विधानसभेच्या कामकाजासंबंधीचा गोपनीय अहवाल सादर झाल्यानंतर बुधवारी सर्वोच्च न्यायालय निकालाची अधिकृत घोषणा करणार आहे.निकाल अधिकृतपणे जाहीर झाला नसला तरी हरीश रावत यांच्या बाजूने ३३ तर भाजपाच्या बाजूने २८ मते मिळाली. मतदानाच्या आधी काँग्रेसच्या रेखा आर्य भाजपाच्या गटात दाखल झाल्या, तर भाजपाने निलंबित केलेले बंडखोर आ. भीमलाल आर्य काँग्रेसच्या कळपात गेले. बसपा तसेच अन्य चार सदस्यांनी रावत यांच्या बाजूनेच मतदान केले. काँग्रेसचे २७ व हे ६ मिळून ३३ हा जादुई आकडा मिळवण्यात रावत सरकार यशस्वी ठरले.उत्तराखंड विधानसभेत सकाळी ११ वाजता शक्तिपरीक्षेसाठीचे कामकाज सुरू झाले आणि दीड तासात ते संपले. या काळात विधान भवनासमोर काँग्रेस व भाजपाचे कार्यकर्ते तसेच पत्रकार, छायाचित्रकार आणि कॅमेरामनची प्रचंड गर्दी झाली होती. आतमध्ये आमदार, विधान भवन कर्मचारी व अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि प्रधान सचिव व त्यांचे कर्मचारी यांच्याखेरीज कोणालाही प्रवेश नव्हता. विधान भवनात मोबाइल नेण्यावरही बंदी घालण्यात आली होती.>कडक बंदोबस्तात असे झाले मतदान..!सरकारच्या बाजूने एकूण ३३ मते. काँग्रेस-२७, पीडीएफ-६ (त्यात बसपाचे २, यूकेडी-१ आणि ३ अपक्ष आमदारांचा समावेश), भाजपा-२८, भाजपाचे भीमलाल आर्य आणि काँग्रेसच्या रेखा आर्य यांनी क्रॉसव्होटिंग केल्याचा दावा काँग्रेसच्या आमदार सरिता आर्य यांनी केला आहे. संपूर्ण विधान भवनाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. चोख सुरक्षा बंदोबस्तात मतदान सुमारे तासभर चालले. पत्रकार, विधिमंडळ कर्मचाऱ्यांनाही आतमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. मतदानासाठी अवघ्या दोन तासांपुरती राष्ट्रपती राजवट हटविण्यात आली होती.>लोकशाही, जनतेचा विजय - काँग्रेसहा लोकशाही, देशाचे संविधान आणि राज्यातील जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली आहे. शक्तिपरीक्षा अतिशय शिस्तबद्ध, शांत आणि घटनात्मक पद्धतीने पार पडली आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालय काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा निर्णय देईल तेव्हा या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय ‘सत्तेची मगरुरी’ असल्याचे सिद्ध होईल, असेही ते म्हणाले.>उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षेच्या निष्पत्तीबाबत भाष्य टाळत रावत यांनी केंद्र सरकारला संघर्षाचे राजकारण संपवून राज्याच्या विकासासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. ६८ वर्षीय रावत यांनी शक्तिपरीक्षा आटोपताच प्रदेश कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि प्रत्येक आमदाराचा नामोल्लेख करीत आभार मानले.