शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून सिद्धू यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर ?

By admin | Updated: October 20, 2016 12:48 IST

निवडणुकीपूर्वी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काँग्रेसने नवज्योत सिंग सिद्धू याला पक्षात प्रवेश केल्यास उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.

ऑनलाईन लोकमत
जालंधर, दि. 20  - पंजाबच्या तख्तावर कब्जा करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आता निवडणुकीपूर्वी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काँग्रेसने नवज्योत सिंग सिद्धू यांना पक्षात प्रवेश केल्यास उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. 
पंजाबमधील भाजपाचा आघाडीचा नेता असताना सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाला सोडचिठ्ठी देऊन स्वत:च्या नव्या पक्षाची घोषणा केली. आता काँग्रेसने विधानसभा निवडणूक जिंकल्यास उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने ठेवल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. तसेच काँग्रेसमधील सूत्रांनीही सिद्धू यांना अशी ऑफर देण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, सिद्धू यांनी काँग्रेसकडून आलेल्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितल्याची समजत आहे.
 
मात्र सिद्धूच्या काँग्रेस प्रवेशाबाबत पक्षाचे पंजाबमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग फारसे उत्साही दिसत नाही. तसेच सिद्धूला काँग्रेस प्रवेश करायचा असल्यास त्याला नव्याने स्थापन केलेली 'आवाज-ए-पंजाब' पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा लागेल, अशी अट घातली आहे. दहा वर्षे सत्तेबाहेर राहिल्यानंतर काँग्रेसला पुन्हा एकदा पंजाब सत्ता स्थापन करायची संधी आहे.  तसेच विविध चॅनेल्सद्वारे घेण्यात आलेल्या कल चाचण्यांनीही काँग्रेसचा उत्साह वाढवला असून, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 'आप'पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे 'अकाली दला'विरोधात जाणाऱ्या मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. तसेच सेलेब्रिटी म्हणून लोकप्रिय असल्याने हिंदू मतदारही सिद्धू यांच्या पक्षाला मत देण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना पक्षात घेण्यासाठी काँग्रेस उत्सुक आहे.