शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या आरोपामुळे काँग्रेस आमदार गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 20:23 IST

केरळमधील काँग्रेसचे आमदार एम. विन्सेट यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत

तिरूवनंतपुरम, दि. 22 -  केरळमधील काँग्रेसचे आमदार  एम. विन्सेट यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. एका महिलेनं केलेल्या तक्रारीनंतर विन्सेटविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. येथील पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्काराच्या आरोपांतर्गत काँग्रेस आमदाराला अटक करण्यात आले आहे. येथील आमदार निवासात तीन तासांहून अधिक वेळ विन्सेट यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर बेड्या ठोकण्यात आल्या.  
 
51 वर्षीय महिलेनं केलेल्या तक्रारीच्या आधारावर विन्सेट यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. विन्सेट यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. बलरामपूरम येथील रहिवासी असलेल्या या महिलेनं विन्सेट यांनी लैंगिक छळ केल्यानंतर  गेल्या आठवड्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. 
 
दोन दिवसांपूर्वी महिलेचं जबाब नोंदवण्यात आल्यानंतर काँग्रेस आमदार विन्सेटविरोधात बलात्कार व पाठलाग करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, विन्सेट यांनी बलात्काराचे आरोप फेटाळून लावले होते. माझा बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंध नसून माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.
 
तर दुसरीकडे,  काँग्रेसमधील वरिष्ठ महिला नेत्यांनीदेखील विन्सेटने राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे असे मत मांडले. त्यामुळे अटकेनंतर विन्सेट राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी बातम्या वाचा