जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसला आता या सभागृहात पहिल्या रांगेत केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागणार आहे. काँग्रेसला तीन-चार जागांची अपेक्षा होती.
पहिल्या रांगेत 2क् पैकी 8 जागा भाजपला, प्रत्येकी एक जागा शिवसेनेचे अनंत गीते आणि लोक जनशक्तीचे नेते रामविलास पासवान, तेलगू देसमचे अशोक गजपती राजू यांच्यासाठी सोडली आहे. पहिल्या रांगेतील दोन जागा सोनिया गांधी व काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकाजरुन खरगे यांच्यासाठी असेल, असे संसदीय कार्य मंत्रलयाच्या सूत्रंनी सांगितले.
ज्येष्ठतेनुसार उपनेते कॅप्टन अमरिंदरसिंग आणि कमलनाथ यांनाही पहिल्या रांगेत स्थान दिले जावे अशी काँग्रेसची इच्छा होती. काँग्रेसकडे संख्याबळ नसल्यामुळे सरकारने ते नाकारले आहे. काँग्रेसच्या बाजूच्या दोन जागा तृणमूल काँग्रेसला देण्यात आल्या आहेत. सोबतच्या जागेवर लोकसभा उपाध्यक्ष आसनस्थ होतील. अण्णाद्रमुकचे के.पी. थम्बीदुराई यांना उपाध्यक्षपद दिले जाणो निश्चित मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अण्णाद्रमुकच्या जयललिता यांच्या भेटीत या मुद्यावर सहमती झाली आहे. याचा अर्थ पहिल्या रांगेत अण्णाद्रमुकचे दोन नेते बसतील.
च्पहिल्या रांगेतील पहिले आसन पंतप्रधान मोदी यांचे असून त्यांच्या बाजूची जागा रिक्त आहे. लागूनच असलेल्या चार जागांवर गृहमंत्री राजनाथसिंग, अर्थमंत्री अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि लालकृष्ण अडवाणी बसलेले असतील. भाजपच्या कोटय़ातील दोन जागा लोकसभेचे माजी अध्यक्ष मुरली मनोहर जोशी आणि लोकसभेचे माजी उपाध्यक्ष कारिया मुंडा यांच्यासाठी सोडल्या आहेत.
च्यापैकी एका जागेवर भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी, वेंकय्या नायडू आणि कलराज मिश्र यांनी दावा सांगितला आहे. संख्याबळ नसतानाही ज्येष्ठतेच्या आधारावर माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांची व्यवस्था पहिल्या रांगेत करण्यात आली आहे. एक जागा बीजदसाठी सोडण्यात आली. पहिल्या रांगेतील एक जागा तेलंगणा राष्ट्र समितीला दिली जाऊ शकते.