शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

उडत्या पाखरांना काँग्रेसने नाकारले

By admin | Updated: September 29, 2014 07:21 IST

काँग्रेस हा आयाराम-गयारामांचा पक्ष असल्याची टीका भाजपा आणि इतरही विरोधक सातत्याने करीत आले तरी, आता उमेदवारीत आयारामांचा भरणा भाजप

यदु जोशी, मुंबईकाँग्रेस हा आयाराम-गयारामांचा पक्ष असल्याची टीका भाजपा आणि इतरही विरोधक सातत्याने करीत आले तरी, आता उमेदवारीत आयारामांचा भरणा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच अधिक असून काँग्रेसच्या यादीमध्ये एकही आयाराम नाही, हे यंदाच्या निवडणुकीचे विशेष!निष्ठावंतांना डावलून आयत्यावेळी आयारामांना संधी द्यायची नाही, असा काँग्रेसने धोरणात्मक निर्णयच घेतला होता. अनायसे राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी मोडली. त्यामुळे लढण्यासाठी २८८ मतदारसंघ मोकळे झाले. वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या स्थानिक कार्यकर्ते, नेत्यांना यावेळी काँग्रेसने उमेदवारी दिली. प्रदीप पवार (पाचोरा), योगेंद्र पाटील (मुक्ताईनगर), लक्ष्मणराव घुमरे (मेहकर), संजय लाखे पाटील (घनसावंगी), दिलीप पाटील (जळगाव ग्रामीण) अशी पक्षसंघटनेत अनेक वर्षे काम करीत असलेली अनेक नावे आता उमेदवार यादीत दिसत आहेत. गेली पाच वर्षे जे काँग्रेसचे सहयोगी सदस्य होते त्यांनाच काँग्रेसने उमेदवारी दिली. पण मौलाना मुफ्ती, शरद गावित अशा इतर पक्षातील आमदारांना आपल्यात आणून राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. तर भाजपा, शिवसेनेने एकमेकांची आणि इतर पक्षातील माणसे पळवून त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. काँग्रेसने हा मोह आवरला. प्रदेश काँग्रेसच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, काँग्रेसमध्ये सातत्याने काम करीत आलेल्यांनाच संधी देण्यामागचा पक्षाचा चांगला हेतू आहे. उद्या यातील कोणी पराभूतही झाले तरी पक्षाचेच काम करत राहतील, पक्षाच्या संपर्कात राहतील. स्थानिक कार्यकर्त्याला तो विधानसभेचा उमेदवार राहिला असल्याचे अभिमानाने सांगता येईल. बाहेरच्याला भाव देऊन उमेदवारी गळ्यात टाकून निष्ठावनांना नाराज करायचे नाही, असे काँग्रेसने ठरविले होते.