शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

काळ््या पैशावाल्यांसाठी काँग्रेस लढतोय : भाजपा

By admin | Updated: April 4, 2017 05:13 IST

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली

नितीन अग्रवाल,नवी दिल्ली- काळा पैसा बाळगणाऱ्यांच्या बाजुने काँग्रेस लढत असल्याचा आरोप भाजपाने केला व भ्रष्टाचाराचे आरोप असलेले हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका करण्यात आली.भाजपचे सरचिटणीस भूपेंद्र यादव रविवारी पक्षाच्या येथील मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘‘काँग्रेस काळ््यापैशाच्या विरोधात नाही तर काळा पैसा बाळगणाऱ्यांसाठी लढत आहे. वीरभद्र सिंह संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये केंद्रात मंत्री असताना त्यांनी सफरचंदांच्या उत्पादनातून सहा कोटी रुपयांचा नफा झाल्याचे आयकर विवरणपत्रात नमूद केले होते. त्याआधी व त्यानंतर त्यांना सफरचंदांच्या बागांतून मिळणारे उत्पन्न शून्य होते.’’ ज्या वाहनांतून सफरचंदे बाजारात पोहचवण्यात आली ती वाहने स्कूटर व मोटारसायकली होत्या, असाही आरोप यादव यांनी केला.भूपेंद्र यादव यांनी वीरभद्र सिंह यांच्या भ्रष्टाचाराच्या निमित्ताने राहुल गांधी यांनाही लक्ष्य केले. राहुल गांधी स्वत:ला शेतकऱ्यांचे हितरक्षणकर्ते समजतात मग त्यांनी वीरभद्र सिंह यांनी कमावलेल्या नफ्याचे गणित देशाला समजावून सांगितले पाहिजे. देशातील कष्टकरी शेतकऱ्यांचा हा अपमान आहे. गांधी हे काहीच बोलत नसल्यामुळे त्यांच्या हेतुबद्दल शंका येत आहे. वीरभद्र सिंह यांचा राजीनामा काँग्रेसने घेतला नाही तर याचा अर्थ असा होईल की भ्रष्टाचाराशी तडजोड करणारा हा पक्ष आहे, असे यादव म्हणाले. गेल्याच आठवड्यात वीरभद्र सिंह यांची माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द करा ही मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. वीरभद्र सिंह यांनी त्यांच्यावरील केंद्रीय गुप्तचर खात्याने केलेले आरोप हे राजकीय हेतुंनी प्रेरीत असल्याचेही म्हटले आहे.>सपचा प्रवक्ता भाजपातसमाजवादी पक्षाचे प्रवक्तेपद भूषवलेले गौरव भाटिया रविवारी भाजपात दाखल झाले. त्यांनी पक्ष मुख्यालयात पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना भाटिया उत्तर प्रदेशचे अवर महाअधिवक्ता होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाटिया यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.भाजपामध्ये दाखल झाल्यावर भाटिया यांनी समाजवादी पक्षातील घराणेशाहीमुळे दु:खी होऊन पक्षाशी नाते तोडल्याचे सांगितले. आत्म्याने हाक दिल्यामुळे मी भाजपात आल्याचा दावा गौरव भाटिया यांनी केला.