भूसंपादन कायद्याच्या दुरूस्तीसाठी काँगे्रसचा धडक मोर्चा
By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST
नवी मुंबई : भूसंपादन करताना शेतकर्यांच्या हिताचे निर्णय आताच्या भूसंपादन कायद्यात नाहीत, त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होणार असल्याने या कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी युवक काँग्रेसच्यावतीने केली आहे. यासंदर्भात शनिवार, ३१ रोजी सकाळी ११ वाजता कोकणभवनवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
भूसंपादन कायद्याच्या दुरूस्तीसाठी काँगे्रसचा धडक मोर्चा
नवी मुंबई : भूसंपादन करताना शेतकर्यांच्या हिताचे निर्णय आताच्या भूसंपादन कायद्यात नाहीत, त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होणार असल्याने या कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी युवक काँग्रेसच्यावतीने केली आहे. यासंदर्भात शनिवार, ३१ रोजी सकाळी ११ वाजता कोकणभवनवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.भाजपा सरकारने २०१४ भूमी अधिग्रहण कायदा केला, मात्र या कायद्यामुळे शेतकर्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कायद्यानुसार सरकार शेतकर्यांची कोणतीही जमीन सहमती न घेता ताब्यात घेऊ शकतो, तसेच प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या वारसांना नोकरी देण्याची अट रद्द करण्यात आली आहे. जमिनीची किंमत ठरविण्याचा अधिकार शेतकर्यांना राहणार नाही. संपादित जमीन प्रकल्पासाठी वापर न झाल्यास शेतकर्याला परत करण्याची मुदत ५ वर्षे होती. आता ती १० वर्षे करण्यात आली आहे. त्याचबरोबर भूसंपादन करताना नोटिफिकेशन अथवा जाहिराती दिल्या जाणार नसल्याचे या कायद्यामध्ये नमूद केले आहे. या कायद्याचा शेतकर्यांऐवजी उद्योजकांना अधिक फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी या कायद्यात आवश्यक असून त्यानुसार कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची मागणी युवक काँग्रेसच्यावतीने केली आहे. त्यानुसार शनिवारी, पिम, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागातील युवक काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, सदस्य आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या मोर्चाचे समन्वयक म्हणून ठाणे लोकसभा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशांत भगत काम बघणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम, उपाध्यक्ष सत्यजित तांबे, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दशरथ भगत आदि मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असल्याचे महाराष्ट्र सचिव पृथ्वी जोशी यांनी सांगितले. यावेळी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत उपस्थित होते. (प्रतिनिधी)