रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणीनाशिक : शहरातील अशोकस्तंभ ते रविवार कारंजा या रस्त्याचे कॉँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. नागरिकांना थेट अशोकस्तंभावरून कारंजा आणि त्यालगतच्या गल्ल्यांमध्ये जाता येत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सदरच्या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.वकीलवाडीतील एकेरी वाहतुकीचा बोजवारानाशिक : वकीलवाडीतील वाहतुकीची अव्यवस्था टाळण्यासाठी महात्मा गांधी रस्त्याकडून हा एकेरी मार्ग करण्यात आला आहे; परंतु त्याचे कोणीही पालन करीत नसून दुहेरी मार्ग म्हणून वापर होत आहे. त्यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडत आहे. याठिकाणी वाहतूक पोलीस नियुक्त करावा, अशी मागणी होत आहे.भंगार बाजार हटविण्याची मागणीनाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सदरचा बाजार हटविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.कुलकर्णी चौकात वाहतूक कोंडीनाशिक : कॉलेजरोडवर बीवायकेजवळ प्रिं. टी. ए. कुलकर्णी सर्कल येथे वाहतुकीची कांेडी होत आहे. सायंकाळी या मार्गावरून जाणार्या तसेच गंगापूररोडकडे जाणार्या वाहतुकीमुळे चौकात वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.चौक मंडई कारंजाची दुरवस्थानाशिक : जुन्या नाशकातील चौक मंडई कारंजाची दुरवस्था झाली आहे. या चौकातून शहरातील सर्व पारंपरिक मिरवणुका सुरू होत असतात. त्यामुळे कारंजाचे सुशोभिकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.शालिमारमध्ये पुन्हा फेरीवाल्यांचे अतिक्रमणनाशिक : शालिमार येथे संदर्भ सेवा रुग्णालयाच्या भिंतीलगत पुन्हा फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. या मार्गावर खंडणीवरून विक्रेत्यांमध्ये हल्ला झाला होता. त्यानंतर पोलिसांनी येथे फेरीवाल्यांना मनाई केली होती; परंतु आता या भागात पुन्हा अतिक्रमण वाढले आहे.महात्मा गांधी रोडवर वाहतुकीची समस्यानाशिक : महात्मा गांधी रोडवर तळघरात वाहनतळांची सोय असताना ते बंद आहे. त्यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेला दुचाकी लावत असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, वाहतूक पोलिसांनी त्वरित वाहनतळ खुले करावे, अशी मागणी होत आहे.
संक्षीप्त पा
By admin | Updated: January 6, 2015 00:19 IST