शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णेच्या हिरव्या पाण्यासाठी दोषींची पोलिस तक्रार करा! जलव्यवस्थापन समितीने घेतला ठराव

By admin | Updated: May 7, 2014 22:17 IST

पूर्णा नदीच्या पात्रात हिरवे दूषित पाणी सोडणार्‍या कंपन्या आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांविरुद्ध पोलिस तक्रार करण्याचा ठराव

अकोला : जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात हिरवे दूषित पाणी सोडणार्‍या कंपन्या आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांविरुद्ध पोलिस तक्रार करण्याचा ठराव जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. नदीतून १३ गावांना पाणीपुरवठा होतो. दूषित पाण्यामुळे त्यापैकी तीन गावांना टँकरने पाणी पुरविण्याची वेळ आली आहे. पूर्णा नदीतील पाणी हिरवे होण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील कंपन्या कारणीभूत असल्याचे आढळून आले. त्यामुळे दोषी कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी वारंवार प्रशासनाकडे केली आहे. त्या दृष्टिकोनातून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये उपस्थित राहण्यासाठी तीन वेळा पत्रही दिले. असे असतानाही अधिकारी सभेकडे फिरकले नाहीत. त्यामुळे आता या अधिकार्‍यांसोबत पाणी दूषित करण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अमरावतीच्या चार कंपन्यांविरुद्ध पोलिस तक्रार करण्याचा ठरावच मंगळवारी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा प्रस्ताव गोपाल कोल्हे यांनी मांडला होता. या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि समिती सदस्यांची उपस्थिती होती.