शेततळे गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती
By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST
रमाकांत पाटील/नंदुरबार : रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील मांडवी खुर्द या एकाच गावात तांत्रिकदृष्ट्या योग्य नसतानाही सुमारे ३५० शेततळ्यांची कामे राबवून त्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार प्राथमिक चौकशीत उघड झाला आहे. या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेऊन चौकशीसाठी संयुक्त समिती गठीत करण्यात आल्याची माहिती जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली.
शेततळे गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती
रमाकांत पाटील/नंदुरबार : रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील मांडवी खुर्द या एकाच गावात तांत्रिकदृष्ट्या योग्य नसतानाही सुमारे ३५० शेततळ्यांची कामे राबवून त्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार प्राथमिक चौकशीत उघड झाला आहे. या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेऊन चौकशीसाठी संयुक्त समिती गठीत करण्यात आल्याची माहिती जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली.धडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रुक या एकाच गावात गेल्या दोन वर्षांत सुमारे ३५० शेततळ्यांची कामे राबविण्यात आली आहेत. वास्तविक मांडवी बुद्रुक हे गाव पूर्णपणे डोंगराळ भागात असून याठिकाणी पडणारा सरासरी पाऊस, पाणी अडविण्याची क्षमता, जमिनीची तपासणी आदी कुठल्याही तांत्रिक बाबी लक्षात न घेता येथे शेततळ्यांची कामे राबविण्यात आली आहेत. या शेततळ्यांपैकी अनेक कामे कागदावरच झाल्याच्याही तक्रारी आहेत. काही कामे यंत्राच्या सहाय्याने करण्यात आली आहेत. त्यातही योग्यप्रकारे व प्रस्तावित मोजमापात कामे झाले नसल्याच्या तक्रारी आहेत. जिल्हा परिषदेने प्राथमिक स्तरावर जेव्हा या कामांची चौकशी केली असता त्यातही गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक स्तरावर निदर्शनास आले आहे.