शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
3
पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
4
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
5
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
6
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
7
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
8
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
9
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
10
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
11
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..
12
बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं
13
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
14
पावसाळ्यात फिरायला जायचंय? बजेटची चिंता सोडा! 'ट्रॅव्हल लोन'ची ही प्रक्रिया फक्त माहिती हवी
15
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा
16
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
17
पाकिस्तानी लष्करप्रमुख धार्मिक कट्टर..; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली आसिम मुनीरची पोलखोल
18
आरोग्य विमा ३० वर्षांचे होण्याआधीच घ्या, नाहीतर 'महाग' पडेल! जाणून घ्या ७ मोठे फायदे
19
Apara Ekadashi 2025: एकादशीचा उपास निरोगी आयुष्य देणारा; फक्त त्यादिवशी 'हा' पदार्थ टाळा!
20
“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले

केजरीवालांना आयोगाची नोटीस

By admin | Updated: January 18, 2015 02:02 IST

आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने शनिवारी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

नवी दिल्ली : ‘भाजपा दिल्लीत सांप्रदायिक हिंसाचार माजविण्याचा प्रयत्न करीत आहे’, असा आरोप करून आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने शनिवारी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.या नोटिसीला उत्तर देण्यासाठी आयोगाने केजरीवाल यांना २० जानेवारीच्या दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत उत्तर दिले नाही तर आयोग विनाविलंब आपला निर्णय घेईल.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी केजरीवाल यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना ही कारणे दाखवा नोटीस बजावली. ‘अशा प्रकारचा आरोप करून तुम्ही (केजरीवाल) आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केला असल्याचे सकृतदर्शनी दिसते’, असे या नोटिसीत म्हटले आहे. दिल्लीत चर्चवर झालेल्या हल्ल्यांसाठी भाजपाच जबाबदार असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला होता. आयोगाने त्यांच्या या आरोपाचाही नोटिसीत उल्लेख केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)