शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या निष्क्रीयतेचा पंचनामा करण्यासाठी एकत्र या! राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक : पक्षाचे निरीक्षक आसिफ शेख यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन

By admin | Updated: March 5, 2016 23:49 IST

जळगाव : दुष्काळ, पाणीटंचाईमुळे शेतकरी बांधव, सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. असे असतानाही शासनाकडून कोणतेही ठोस प्रयत्न केले जात नाही. शासनाच्या निष्क्रीयतेमुळेच सर्वत्र बिकट स्थिती ओढावली आहे. आगामी काळात राष्ट्रवादी कॉँग्रेस शासनाच्या विरोधात कठोर भूमिका घेणार आहे. शासनाच्या निष्क्रीयतेचा पंचनामा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन मीरा-भाईंदर महापालिकेचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पक्ष निरीक्षक डॉ.आसिफ शेख यांनी केले.

जळगाव : दुष्काळ, पाणीटंचाईमुळे शेतकरी बांधव, सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. असे असतानाही शासनाकडून कोणतेही ठोस प्रयत्न केले जात नाही. शासनाच्या निष्क्रीयतेमुळेच सर्वत्र बिकट स्थिती ओढावली आहे. आगामी काळात राष्ट्रवादी कॉँग्रेस शासनाच्या विरोधात कठोर भूमिका घेणार आहे. शासनाच्या निष्क्रीयतेचा पंचनामा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन मीरा-भाईंदर महापालिकेचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पक्ष निरीक्षक डॉ.आसिफ शेख यांनी केले.
जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट तसेच पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी डॉ.आसिफ शेख जळगावात आले होते. दुपारी तीन वाजता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यालयात जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डॉ.शेख पुढे म्हणाले की, केंद्रासह राज्यात सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सत्ताधार्‍यांविरोधात प्रचंड खद्खद् आहे. हेच वातावरण आपल्यासाठी पोषक आहे. शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेस तीव्र स्वरुपाची आंदोलने छेडणार आहे. लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडी-अडचणी समजून घ्या, त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करा, लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
विकासात्मक दृष्टिकोनातून खाविआला पाठिंबा
जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने खान्देश विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. जळगाव शहराचा विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात विकासकामे झाली पाहिजेत, जळगावचा विकास साधला जावा, हा एकमेव उद्देश त्यामागे असल्याचे डॉ.आसिफ शेख म्हणाले.
पक्षात कोणतेही मतभेद नाहीत
मध्यंतरी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने पक्ष टीकेचा धनी ठरला होता. परंतु पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीने हे मतभेद दूर करण्यात आले. प्रत्येक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतात. मतभेद असण्यात काही गैर नाही; परंतु मनभेद असता कामा नये. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे मनभेद नाहीत. म्हणून जिल्‘ासह राज्यात राष्ट्रवादीचे पक्षसंघटन अतिशय मजबूत आहे. आगामी काळात येणार्‍या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागावे, असे आवाहन शेख यांनी केले.