शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये बहुरंगी लढतीची रंगीत तालीम

By admin | Updated: September 26, 2014 23:10 IST

राज्यातील युती आणि आघाडीचा घोळ मिटत नसल्याने इतर ठिकाणाप्रमाणे पनवेल विधानसभा मतदारसंघातही संभ्रम निर्माण झाला आहे.

प्रशांत शेडगे, पनवेलराज्यातील युती आणि आघाडीचा घोळ मिटत नसल्याने इतर ठिकाणाप्रमाणे पनवेल विधानसभा मतदारसंघातही संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनही उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरु झाली आहे. युती आणि आघाडी झाली नाही तर पनवेलमध्ये बहुरंग लढत होणार असल्याने त्यामुळे चुरस अधिक वाढणार आहे. या लढतीची तयारी सर्व पक्षांकडून करण्यात आली असून त्याची रंगीत तालीम सध्या सुरु आहे.शहरी बहुल मतदारसंघ असलेला पनवेल हा शेकापचा गड मानला जातो. या ठिकाणी २००९ सालापर्यंत सतत लालबावट्याचा आमदार निवडून येत असे. मात्र शहरीकरण तसेच रामशेठ ठाकूर यांनी २००४ साली केलेला काँग्रेस प्रवेश यामुळे या मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलली आणि शेकापचा गड काँग्रेसने घेतला. गेली दहा वर्षे हे दोन पक्षच या ठिकाणी सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले. मात्र दोन दिवसांपूर्वी रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी कमळ हातात घेतले त्यामुळे काँग्रेस खिळखिळी झाली. आजमितीला पक्षाला या मतदारसंघात उमेदवार मिळेनासा झाला आहे. त्यामुळे पंजा हतबल झाला असून उमेदवाराकरिता शोधा शोध सुरु आहे. कोणी आयात करता येईल का याचा विचार काँग्रेसवाले करीत आहेत. त्याकरीता राष्ट्रवादीतील एका नेत्यालाही विचारणा करण्यात आली आहे. उरणमधून महेंद्र घरत यांचे नाव जाहीर झाल्याने शाम म्हात्रे आवाज पनवेलमध्ये घुमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान राज्यात दोनही काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे असल्याने राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष सुनील घरत यांना विचारणा झाल्याचे समजते. उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करण्याचे फर्मानही त्यांना जिल्हाध्यक्षांनी सोडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भाजपकडून प्रशांत ठाकूर यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यादृष्टीने शक्तिप्रदर्शनही झाले.तसे सूतोवाच नितीन गडकरी, विनोद तावडे आणि सुधीर मुनगंटीवार या नेत्यांनी केले आहेत.त्यामुळे शुक्रवारी ठाकूर उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे समजते. मात्र जागावाटपाचे घोडे अडल्याने शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख बबन पाटील किंवा चंद्रशेखर सोमण निवडणूक अर्ज अर्ज भरण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच बाबतीत आघाडीवर असलेल्या शेकापचे उमदेवार बाळाराम पाटील यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत आपला निवडणूक अर्ज भरला.