शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉलेजियम’वरून सरकार, न्यायसंस्थेत विसंवाद

By admin | Updated: August 12, 2014 02:04 IST

न्यायाधीशांनीच न्यायाधीशांची नेमणूक करण्याच्या गेली दोन वर्षे अस्तित्वात असलेल्या ‘कॉलेजियम’ पद्धतीचे जोरदार समर्थन करून यावरून न्यायंसस्थेला नाहक बदनाम केले

नवी दिल्ली : न्यायाधीशांनीच न्यायाधीशांची नेमणूक करण्याच्या गेली दोन वर्षे अस्तित्वात असलेल्या ‘कॉलेजियम’ पद्धतीचे जोरदार समर्थन करून यावरून न्यायंसस्थेला नाहक बदनाम केले जात असल्याचे सडेतोड भाष्य सरन्यायाधीश न्या. राजेंद्रमल लोढा यांनी सोमवारी केले तर दुसरीकडे ही पद्धत मोडीत काढून त्याऐवजी न्यायाधीशांच्या निवडीसाठी स्वतंत्र सहा सदस्यीय आयोग स्थापन करण्यासंबंधीचे घटनादुरुस्तीविधेयक मोदी सरकारने लोकसभेत सादर केले. याच धर्तीवर आधीच्या संपुआ सरकारने मांडलेले विधेयक, सर्वाधिक सदस्य असलेल्या काँग्रेसला एकाकी पाडून, इतर विरोधी पक्षांच्या पाठिंब्याने सरकाने राज्यसभेतून मागे घेतले.‘कॉलेजियम’ची पद्धत अपयशी ठरली असेल तर या पद्धतीने नेमले गेलेले सर्वोच्च व उच्च न्यायालयांमधील सर्वच विद्यमान न्यायाधीश हेही त्याच अपयशीची उत्पत्ती आहे व पर्यायाने संपूर्ण न्यायव्यवस्थाच अपयशी ठरली, असे म्हणावे लागेल, असे सांगून ‘कॉलेजियम’ची कार्यपद्धती व निर्णय याविषयी चुकीच्या माहितीवरून बदनामी करणाऱ्यांवर न्या. लोढा यांनी सडकून टीका केली. एखाद-दुसऱ्या न्यायाधीशावर आरोप झाले म्हणून संपूर्ण व्यवस्थेलाच बदनाम करणे योग्य नाही. योग्य व्यक्ती निवडण्यात ‘कॉलेजियम’लाही काही मर्यादा आहेत. शेवटी न्यायाधीशही याच समाजातून आलेले असतात, असे म्हणून सरन्यायाधीशांनी ‘कॉलेजियम’चे समर्थन केले.सरन्यायाधीशांनी हे कठोर भाष्य सकाळी केले आणि संध्याकाळी ‘कॉलेजियम’ पद्धत मोडीत काढून त्याऐवजी न्यायाधीश निवडीसाठी स्वतंत्र आयोग नेमण्याची तरतूद असलेले विधेयक विधी आणि न्यायमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी लोकसभेत सादर केले. या आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयकही सरकारने मांडले. यापैकी आयोगाच्या रचनेसंबंधीचे विधेयक साध्या बहुमताने मंजूर होऊ शकेल. पण घटनादुरुस्ती विधेयकासाठी सरकारला दोन-तृतियांश बहुमताची जुळवाजुळव करावी लागेल. याआधी संपुआ सरकारने गेल्या वर्षी मांडलेले न्यायिक नेमणूक आयोग विधेयक राज्यसभेतून मागे घेऊन सरकारने तेथे आपले नवे विधेयक मांडण्याचा मार्ग मोकळा केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)