युती-आघाडी झाल्यास बंडखोरीचा धोका शिक्षक बँक निवडणूक : शिक्षक नेत्यांकडून सावध भूमिका
By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST
अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. १) पासून माघारीची मुदत सुरू होत आहे. बँकेच्या २१ संचालकपदाच्या जागांसाठी ६७५ इच्छुकांचे अर्ज शिल्लक असून कोणत्याच मंडळाने अद्याप युती-आघाडीची घोषणा केलेली नाही. युती-आघाडी झाल्यास जागा वाटपाचा प्रश्न निर्माण होणार असून यात बंडखोरीचा धोका असल्याने सर्व मंडळाच्या नेत्यांकडून सावध भूमिका घेण्यात येत आहे.
युती-आघाडी झाल्यास बंडखोरीचा धोका शिक्षक बँक निवडणूक : शिक्षक नेत्यांकडून सावध भूमिका
अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. १) पासून माघारीची मुदत सुरू होत आहे. बँकेच्या २१ संचालकपदाच्या जागांसाठी ६७५ इच्छुकांचे अर्ज शिल्लक असून कोणत्याच मंडळाने अद्याप युती-आघाडीची घोषणा केलेली नाही. युती-आघाडी झाल्यास जागा वाटपाचा प्रश्न निर्माण होणार असून यात बंडखोरीचा धोका असल्याने सर्व मंडळाच्या नेत्यांकडून सावध भूमिका घेण्यात येत आहे.जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकपदासाठी येत्या २८ तारखेला मतदान होणार आहे. १ ते १५ तारखेदरम्यान माघारीसाठी मुदत देण्यात आलेली आहे. या काळात इच्छुकांच्या उमेदवारी अर्जांची माघार घेताना नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. या निवडणुकीत गुरुमाउली, गुरुकुल, सदिच्छा, इब्टा, गुरुसेवा, ऐक्य मंडळ लढणार आहेत. या सर्व मंडळांच्या इच्छुकांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक २०० हून अधिक इच्छुकांचे अर्ज गुरुकुल आणि गुरुमाउली मंडळांकडून दाखल करण्यात आलेले आहेत. सदिच्छा मंडळाने जवळपास दीडशे अर्ज दाखल केलेले आहेत. ऐक्य मंडळाने ६०, इब्टाने ५० च्या जवळपास, गुरुसेवा मंडळाने ३० च्या जवळपास उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. आता यापैकी ज्या मंडळाची युती अथवा आघाडी होईल, त्यांच्यात जागा वाटप कसे होणार, इच्छुकांची समजूत कशी काढणार, असा प्रश्न आहे. यातून नाराजांची संख्या वाढणार असून याचा फायदा प्रतिस्पर्धी मंडळाला होणार आहे. .........शिक्षक बँकेवर शिक्षक नेत्यांसह शिक्षण विभागातील अधिकार्यांची नजर आहे. यातून गटविकास अधिकारी बाळासाहेब धनवे, विस्तार अधिकारी रमजान पठाण, शिवाजी कराड, अनिल श्िंादे, राजेश पावसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. बँकेचा मोह अधिकार्यांना सुटत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यासह काही अधिकारी पडद्याआडून बँकेची निवडणूक चालवत आहेत. .......... बँक निवडणुकीसाठी सर्व मंडळांनी जय्यत तयारी केलेली आहे. या निवडणुकीत प्रत्येक मंडळाचा खर्च लाखोंच्या घरात जाणार असून त्यासाठी आधीच आर्थिक तजबीज करण्यात आलेली आहे. आजपासून शिक्षण विभागाची प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात गुणवत्तेची तपासणी सुरू होणार आहे. ..........