शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाण कोेसळली; दहा मजुरांचा मृत्यू

By admin | Updated: December 31, 2016 02:08 IST

झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात कोळसा खाण कोसळून ११ मजुरांचा मृत्यू झाला असून, त्यात आणखी किमान ४0 ते ५0 जण ३00 फूट खाली अडकले आहेत. त्यामुळे मृतांची

- एस. पी. सिन्हा,  गोड्डा झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात कोळसा खाण कोसळून ११ मजुरांचा मृत्यू झाला असून, त्यात आणखी किमान ४0 ते ५0 जण ३00 फूट खाली अडकले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इस्टर्न कोलफिल्ड कंपनीच्या व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी रात्री कामाच्या वेळी अचानक खाण कोसळली आणि क्षणार्धात ३०० फूट खाणीचे मैदानात रूपांतर झाले. गोड्डा जिल्ह्याच्या ललमटिया भागात भोडाय कोल माइन्स साइटवर गुरुवारी रात्री काही भाग ढासळला. ढिगाऱ्यातून काढलेल्या दहापैकी पाच मृतदेहांची ओळख पटली आहे. यातील एक जण झारखंडचा, तीन बिहारचे, तर एक जण उत्तर प्रदेशचा मजूर आहे. या खाणीत २० व्होल्वो, एक डोजर, सहा पोकलेन व्होल्वो, एक बोलेरो फसली आहेत. या दुर्घटनेनंतर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मदतकार्य सुरू होण्यास उशीर झाला. या खाणीत दबले गेलेले सर्व मजूर एका खासगी कंपनीचे आहेत. ईसीएलने खासगी कंपनीला उत्खननाचे काम सोपवले आहे. (वृत्तसंस्था)क्षणार्धात सपाटअसे सांगण्यात येत आहे की, गुरुवारी रात्री कामाच्या वेळी अचानक खाण ढासळली आणि क्षणार्धात ३०० फूट खाण सपाट मैदानात परिवर्तित झाली. या घटनेनंतर कर्मचारी आणि मजुरांच्या कुटुंबातून संताप व्यक्त केला जात आहे. इशाऱ्याकडे दुर्लक्ष : तीन दिवसांपूर्वीच या खाणीत उत्खननाचे काम सुरू करण्यात आले होते. तत्पूर्वी, ईसीएलकडून या ठिकाणी पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा उत्खननास परवानगी देण्यात आली. एका इंजिनिअरने या खाणीत भेगा पडल्याची सूचना दिली होती; पण त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. कंपनीने घेतला नव्हता धडारात्री हेमनारायण यादव या कामगाराला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केंदुआ गावातील वाहन चालक शहादत अंसारी यांनी सांगितले की, खाणीत जिथे ढिगारे कोसळले आहेत तिथे ड्रील मशीनही कोसळली आहे. कंपनीने यापूर्वीच्या घटनेतून धडा घेतला नाही आणि तसेच काम सुरू ठेवले.मृतांच्या नातेवाइकांना १२ लाखांची मदतया दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १२ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. झारखंड सरकारकडून दोन लाख रुपये, तर महालक्ष्मी कंपनीकडून प्रत्येकी पाच लाख आणि ईसीएल कंपनीकडून पाच लाख रुपयांची मदत मिळणार आहे. जखमींना राज्य सरकारकडून २५ हजार रुपये मिळणार आहेत. - केंद्रीय ऊर्जा आणि कोळसामंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, मदतकार्य सुरू आहे. घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर गोयल यांनी गोड्डाच्या उपायुक्तांकडून या प्रकरणाची माहिती घेतली. मुख्यमंत्री रघुवर दास यांनी घटनास्थळी पाहणी केली. तपासात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. - झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, मी ललमटियाच्या पीडितांशी चर्चा केली. येथे ७० च्या आसपास लोक फसले आहेत. सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशी परिस्थिती राज्यात २० ते २५ जागेवर आहे. या ठिकाणीही कधीही अशी दुर्घटना होऊ शकते.