सीएनएक्स
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
१. सातासमुद्रापलिकडील रक्षाबंधनदादा राखी बांधायला कधी येशील? किती वाजता भेटायचं ? बहीणीचा प्रश्न, अगं तु घरच्या गडबडीत असलीस तर मीच येतो. अशी भावाची अगदी समजूतदार प्रतिक्रिया.असा संवाद राखीपौर्णिमा जवळ आली की अगदी सहज व्हायचा पण काळाच्या ओघात या संवादाचे स्वरुप बदलले. स्काइपवर कधी भेटूया? तुझी कामं झाली की ...
सीएनएक्स
१. सातासमुद्रापलिकडील रक्षाबंधनदादा राखी बांधायला कधी येशील? किती वाजता भेटायचं ? बहीणीचा प्रश्न, अगं तु घरच्या गडबडीत असलीस तर मीच येतो. अशी भावाची अगदी समजूतदार प्रतिक्रिया.असा संवाद राखीपौर्णिमा जवळ आली की अगदी सहज व्हायचा पण काळाच्या ओघात या संवादाचे स्वरुप बदलले. स्काइपवर कधी भेटूया? तुझी कामं झाली की कळव,आमची रात्र असेल तेव्हा फोन कर म्हणजे आपण निवांत बोलू शकू, बहीणतुला गिफ्ट काय हवे त्याची लिंक पाठव. लगेच बुक करतो आणि पाठवून देतो. असे संवाद आता सर्रास कानावर येऊ लागले.राखीपौर्णिमा म्हटले की भाऊरायाच्या हातावर कोणती शोभून दिसेल अशा राखीची खरेदी आणि भाऊरायाने बहीणीला काय भेटवस्तू द्यायची याची तयारी हे चित्र ठरलेले. पण आता हे चित्र बदलत असून भारतातील परदेशी असणार्यांची संख्या झपाट्याने वाढली. मग पूर्वी राखीपौर्णिमेला बहीणीच्या घरी जेवायला जाणारा भाऊ आता इंटरनेटच्या माध्यमातून बहीणीशी संवाद साधायला लागला. यातही सोशल नेटवर्कींग साइटसवरुन भावाला पाठवली जाणारी राखीची चित्रे, राखीपौर्णिमेचा संदेश आणि विविध कल्पक व्हीडिओ यांचे प्रमाण वाढले आहे. परदेशी असणार्या भावाला किंवा बहीणीला भेटणे शक्य नसल्याने मग या दिवशी त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी व्हॉइस कॉल किंवा व्हीडिओ चॅटचा पर्याय अनेकांकडून निवडला जातो. त्यामुळे भावाला ओवाळत त्याच्या हातून भेटवस्तू घेण्याची मजा काही प्रमाणात कमी झालेली दिसते. मग हाच दादा आपल्या बहीणीला परदेशातून येताना भेटवस्तू आणतोच की पण राखीपौर्णिमेला मिळणार्या भेटवस्तूची मजा त्यात नसते. २. सणांचाही झाला इव्हेंटदिवसेंदिवस सणवारांनाही इव्हेंटचे रुप यायला लागले आणि भावनांपेक्षा त्यातील भौतिक गोष्टींचेच महत्त्व जास्त वाढले. सोन्याचांदीच्या राख्या, भाऊ आणि बहीणीला देण्यासाठी घेण्यात येणार्या भेटवस्तू, ऑनलाईन खरेदी यांचे प्रस्थ वाढले. मग त्यामागील बहीणीचे रक्षण करण्याची भावाची भूमिका काही प्रमाणात मागे पडली का? यासाठी विविध वस्तूंची सजलेली दुकाने बहीणींना खूणावू लागली. मग आपल्या भावाकडून काय घ्यायचे याचे बहीणींचा प्लॅनिंग राखीपौर्णिमा जवळ आली की सुरु होते. यात अगदी मोबाईल, घड्याळ यांपासून दागिने कपडे अशा अनेक वस्तूंचा समावेश असतो. यादरम्यान बाजारातही वेगवेगळ्या ऑफर्स देऊन आपल्या ब्रँडकडे किंवा दुकानाकडे आकर्षित करण्याचे अनेक फंडे अवलंबले जातात. मग राखीपौर्णिमेमध्ये कृत्रिमपणा आला आहे का आणि दिखाऊपणा म्हणून हा सण साजरा केला जात आहे का असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय रहात नाही.