शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सीएनएक्स- पाळणाघराच्या पुढची पायरी डे केअर सेंटर्स ..1

By admin | Updated: May 18, 2015 01:16 IST

- आता बाळासाठी नोकरी सोडायची गरज नाही - नागपुरातही रुजतेय पाश्चिमात्य संकल्पना

- आता बाळासाठी नोकरी सोडायची गरज नाही - नागपुरातही रुजतेय पाश्चिमात्य संकल्पना
आज कितीतरी विवाहित मुलींना त्यांचं करिअर महत्त्वाचं वाटत असतं. यासाठी लग्नाच्या आधीपासूनच त्यांचे प्रयत्न सुरूही झालेले असतात. परंतु लग्न झाले की जीवनाची दिशा बदलते आणि बाळाचे आगमन झाले की आधी ठरवलेल्या अनेक योजनांना थेट गुंडाळूनच ठेवावे लागते. लग्नानंतर नोकरी सोडणं म्हणजे कित्येक जणींना मूर्खपणाचं वाटतं. त्यामुळे अनेक जणी आपल्या मुलांना आपल्या ओळखीच्या नातेवाईकांकडे ठेवतात किंवा मग आपल्या आई आणि सासूचं घर जवळ असेल तर त्यांची मदत मागतात. परंतु जे जोडपे आपल्या शहरापासून लांब राहतात त्यांना पाळणाघराचाच आधार घ्यावा लागतो. परंतु पाळणाघरात केवळ मुलांचा सांभाळ केला जातो. त्यांच्या शिक्षणाची वा मनोरंजनाची येथे फारशी सोय नसते. म्हणूनच आता डे केअर सेंटर्स जन्माला आले असून, येथे मुलांच्या चौफेर विकासाकडे विशेष लक्ष दिले जाते. डे केअर सेंटर्स ही मूळची पाश्चिमात्य संकल्पना असली तरी ती आपल्या नागपुरातही छान रुजायला लागली असून, अनेक पालकांना आता बाळासाठी नोकरी सोडायची गरज राहिलेली नाही.

तारेवरच्या कसरतीवर प्रभावी पर्याय
मूल लहान असतं आणि नोकरीची गरज असते तेव्हा नोकरी आणि मूल सांभाळणं ही तारेवरची कसरत असते. अशा वेळी मुलांचा सांभाळ हा जोडप्यांपुढे मोठा प्रश्न असतो. अशा वेळी डे केअर सेंटर्स किंवा चाईल्ड सेंटर्स ऑफिसच्या आसपास असेल तर त्या जोडप्याचा केवढा तरी मोठा प्रश्न सुटल्यात जमा होईल. आपल्या नागपुरात अशी काही सेंटर्स हळूहळू उदयाला येत आहेत. अनेक जोडपी सकाळी ९-१० वाजता घर सोडलं की घरी परत यायला रात्रीचे ८ वाजतात. दिवसभराच्या कामाने आणि ताणाने थकून जातात. स्वत:चं आवरण्यापलीकडे त्यांच्याकडे वेळच नसतो. पण लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांना बाळ झाले की मग पुढे नोकरीचा प्रश्न उभा ठाकतो. प्रसूतीनंतरचे सहा महिने भुर्रकन उलटून जातात. मात्र त्यानंतर पुढे काय? अशात नोकरीसाठी जायचे लागल्यास बाळ कुठे ठेवायचे, हा प्रश्न समोर येतो. मग त्यांच्याजवळ पर्याय म्हणजे एकच, पाळणाघर. पण घरगुती पाळणाघर म्हणजे वेळेची मर्यादा ही आलीच. यावर पर्याय डे केअर सेंटर ठरले आहेत.