देवळा : सोशल मीडियावर शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्र टाकल्याच्या निषेधार्थ सोमवारी देवळा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. भाजपा, सेना व मुस्लीमबांधवांच्या वतीने देवळ्याच्या तहसीलदार शर्मिला भोसले यांना निवेदन देण्यात येऊन असे कृत्य करणार्या समाजकंटकांना कडक शासन करण्याची मागणी करण्यात आली. सोमवारी सदर घटनेच्या निषेधार्थ देवळा येथे कडकडीत बंद पाळण्यात आल्याने दिवसभर सर्व दुकाने बंद होती. यावेळी देवळा शहरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. दुपारी भाजपा व शिवसेनेच्या वतीने तहसीलदार शर्मिला भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पंकज निकम, अशोक आहेर, नंदू जाधव, भाजपाचे किशोर आहेर, धनंजय आहेर, प्रवीण आहेर, अनुप पटेल, उमेश आहेर आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
देवळा येथे कडकडीत बंद
By admin | Updated: June 3, 2014 01:43 IST