क्लस्टरचा फायदा धोकादायक इमारतींना अशक्य संजीव जयस्वाल - घूमजाव करून जाहीर दिलगिरी व्यक्त
By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST
ठाणे : क्लस्टर योजनेच्या माध्यमातून मिळणार्या अधिकच्या एफएसआयमुळे ठाणे शहरातील पायाभूत सुविधांवर ताण पडणार नसल्याची माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्वसाधारण सभेत दिली. तसेच क्लस्टर राबवताना ४० ते ४५ टक्के इमारती या अधिकृत असायला हव्यात, असे अनेक नियम असल्याने तिचा फायदा शहरातील १०० टक्के धोकादायक इमारतींना मिळेलच, याची शाश्वती नसल्याचेही पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण कधीही क्लस्टरविरोधात नव्हतो, असे घूमजाव करून प्रशासक म्हणून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली.
क्लस्टरचा फायदा धोकादायक इमारतींना अशक्य संजीव जयस्वाल - घूमजाव करून जाहीर दिलगिरी व्यक्त
ठाणे : क्लस्टर योजनेच्या माध्यमातून मिळणार्या अधिकच्या एफएसआयमुळे ठाणे शहरातील पायाभूत सुविधांवर ताण पडणार नसल्याची माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्वसाधारण सभेत दिली. तसेच क्लस्टर राबवताना ४० ते ४५ टक्के इमारती या अधिकृत असायला हव्यात, असे अनेक नियम असल्याने तिचा फायदा शहरातील १०० टक्के धोकादायक इमारतींना मिळेलच, याची शाश्वती नसल्याचेही पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण कधीही क्लस्टरविरोधात नव्हतो, असे घूमजाव करून प्रशासक म्हणून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. क्लस्टरसंदर्भातील शिल्लक राहिलेली आपली भूमिका आयुक्तांनी बुधवारी सर्वसाधारण सभेमध्ये स्पष्ट केली. या वेळी त्यांनी सुरुवातीलाच घूमजाव करून माझा क्लस्टरला विरोध नव्हता, अशी भूमिका विशद केली. मुंबई आणि इतर शहरांमध्ये क्लस्टर योजना लागू केल्यानंतर याचा मोठा ताण शहरातील पायाभूत सुविधांवर पडणार असून यासंदर्भात कोर्टात एक याचिका दाखल झाली होती. पालिका आयुक्तांनी मात्र क्लस्टरसंदर्भात माहिती देताना या योजनेच्या माध्यमातून मिळणार्या वाढीव एफएसआयचा ठाण्यातील पायाभूत सुविधांवर कोणत्याही प्रकारचा ताण पडणार नसल्याचे स्पष्ट केले. भविष्यात क्लस्टर योजनेमध्ये ७५ टक्के समावेश हा ठाणेकरांचा असल्याने केवळ २० ते ३० टक्के नागरिक हे ठाणे शहराच्या बाहेरचे असतील. बाहेरचे नागरिक हा वाढीव एफएसआय वापरणार नाहीत, अशा दृष्टीनेच आम्ही इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार करत असल्याचे ते म्हणाले.क्लस्टरमधून ४ किंवा दुप्पट एफएसआय मिळणार असल्याने तेवढ्या पायाभूत सुविधा पालिका प्रशासनाला निर्माण कराव्या लागणार आहेत. मात्र, ठाण्यात परिस्थिती वेगळी असून ७५ टक्के नागरिक पालिकेच्या पायाभूत सुविधांचा लाभ घेत असून याच नागरिकांचा समावेश क्लस्टरमध्ये होणार असल्याने त्यांच्यासाठी वेगळ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात वाढणार्या लोकसंख्येचा विचार करूनच हा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. तसेच इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल हा अंमित टप्प्यात असून सिटी डेव्हलपमेंट प्लॅन यापूर्वीच तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले..................