शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सुट्या सिगारेट विक्रीवर लवकर बंदी येणार?

By admin | Updated: September 11, 2014 03:30 IST

देशात आणि प्रामुख्याने तरुणवर्गात वाढत असलेल्या तंबाखूसेवनाच्या व्यसनास आळा घालण्याच्या कठोर उपायांचा एक भाग म्हणून सुट्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी

नवी दिल्ली : देशात आणि प्रामुख्याने तरुणवर्गात वाढत असलेल्या तंबाखूसेवनाच्या व्यसनास आळा घालण्याच्या कठोर उपायांचा एक भाग म्हणून सुट्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी घालण्यावर मोदी सरकार विचार करीत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. सिगारेटच्या एकूण विक्रीपैकी ७० टक्के विक्री सुट्या सिगारेटची होते व प्रत्येकास दरवेळी एकदम संपूर्ण पाकीट खरेदी करणे परवडेलच असे नाही, हे लक्षात घेता अशी बंदी घातली की सिगारेटचा खप आपोआपच कमी होईल, असा यामागचा विचार आहे.तंबाखूच्या प्राणघातक व्यसनाविरुद्ध कोणते उपाय योजावेत यावर विचार करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने दिल्ली सरकारचे माजी प्रधान सचिव रमेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल गेल्या आठवड्यात मंत्रालयास दिला असून त्यात इतर बाबींखेरीज वरील शिफारशीचा समावेश आहे.तंबाखू उत्पादनांवरील अबकारी करातून सरकारला दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळतो व या उत्पादकांची लॉबीही खूप बळकट आहे. असे असले तरी मोदी सरकारकडून काही कठोर उपाय योजले जाणे अपेक्षित आहे. याचे कारण असे की, पंतप्रधान म्हणून मोदींना शपथ घेतल्यानंतर पाचच दिवसांनी जागतिक तंबाखूविरोधी दिवस आला होता. त्यावेळी दिलेल्या संदेशात मोदींनी, तंबाखूसेवनाच्या धोक्यांविषयी जनजागृती करण्याची व तंबाखूसेवनास आळा घालण्याची शपथ घेण्याचे देशवासीयांना आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर तंबाखूसेवनाच्या विरोधात कडक कायद्याची तयारी सरकार करीत असून त्याचे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाऊ शकते. त्यादृष्टीने रमेश चंद्र समितीच्या शिफारशींवर मंत्रालयात विचार करण्यात येत आहे. नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही समिती नेमली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)