शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण वीज तारा उठल्या जीवावर भोकर : ७५ टक्के नागरिक शिधापत्रिकेपासून वंचीत, आरोग्य केंद्र बेवारस

By admin | Updated: May 13, 2016 22:35 IST

जळगाव- चार दशकांपूर्वी भोकर येथे टाकलेल्या वीजतारा बदलण्याची तसदी वीज कंपनी घेत नसल्याने त्या जीर्ण होऊन वारंवार तुटत आहे. त्यामुळे वीजवाहक तार अंगावर पडून कोणाचा जीव जाण्याची वाट कंपनी पाहत आहे का? असा सवाल भोकर येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. शिवाय ७५ टक्के नागरिकांना शिधापत्रिका मिळाल्या नसल्याचीही तक्रार आहे.

जळगाव- चार दशकांपूर्वी भोकर येथे टाकलेल्या वीजतारा बदलण्याची तसदी वीज कंपनी घेत नसल्याने त्या जीर्ण होऊन वारंवार तुटत आहे. त्यामुळे वीजवाहक तार अंगावर पडून कोणाचा जीव जाण्याची वाट कंपनी पाहत आहे का? असा सवाल भोकर येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. शिवाय ७५ टक्के नागरिकांना शिधापत्रिका मिळाल्या नसल्याचीही तक्रार आहे.

वीज तारांना जागोजागी जोड; गावाबाहेरुन रस्ता करण्याची मागणी....
भोकर येथे वीज पुरवठ्यासाठी १९७६ मध्ये वीज वाहक तारा जोडण्यात आल्या. याला आता ४० वर्षे उलटले तरी त्या बदलल्या गेलेल्या नाही. शिवाय त्या वेळचा दाब व आताचा दाब कितीतरी पटीने वाढून तो या वीज तारांना सोसवत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दाब वाढण्यासह त्या जीर्ण झाल्याने वारंवार तुटून पडत आहे. साधारण दोन दिवसातून एकदा तर कधीकधी सकाळ-संध्याकाळ अशा दोन्ही वेळेस या तारा तुटून लोंबकळतात, असे येथील नागरिकांनी सांगितले.
या वीजतारा इतक्या खाली आल्या आहेत की, अनेक ठिकाणी हात वर केला की, सहज या तारांचा स्पर्श होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकार जीवावर बेतणारा आहे.
वीज तार केव्हा तुटून पडेल हे सांगता येत नाही, त्यामुळे भर उन्हाळ्यात उकाडा होत असला तरी नागरिक रात्री बाहेर झोपण्यास धजावत नसल्याचेही सांगण्यात आले. या जीर्ण वीजतारा बदलण्याविषयी ग्रामसभेचा ठराव करुन तो पाठविण्यातदेखील आला. त्या बदलण्याचे केवळ आश्वासन मिळाले आहे.
या गावातून तीर्थक्षेत्र रामेश्वर व परसोद येथे जाणारा रस्ता आहे. या ठिकाणी बाहेर गावचे नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे सर्व वाहने गावातूनच जातात. यासाठी गावाबाहेरुन रस्ता करण्याचीही मागणी आहे.

भर पुरातून नागरिकांचा प्रवास...
गावाशेजारुन वाहणार्‍या तापी नदीवर पूल करण्याची जुनी मागणी आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. पावसाळ्यात चोपडा अथवा जळगावला जायचे झाल्यास नदीला पूर आला असतानाही त्या भर पुरातून नावेतून प्रवास करावा लागतो. कधी काय दुर्घटना होईल सांगता येत नाही. त्यामुळे तापी नदीवर पूल बांधण्यात यावा अशी, येथील नागरिकांनी मागणी केली आहे.