शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा यांच्या शोधनिबंधाची जागतिक पातळीवर दखल

By admin | Updated: April 25, 2015 02:10 IST

आधुनिक शस्त्रक्रिया : दक्षिण कोरियातील तज्ज्ञांच्या संमेलनाचे आमंत्रण

आधुनिक शस्त्रक्रिया : दक्षिण कोरियातील तज्ज्ञांच्या संमेलनाचे आमंत्रण
नाशिक : येथील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी लहान मुलांवर केलेल्या आधुनिक शस्त्रक्रियेवर आधारित शोधनिबंधाची दक्षिण कोरियात होणार्‍या अमेरिकन कार्डिओलॉजिस्टच्या मेळाव्यात सादरीकरणासाठी निवड झाली असून, येत्या २७ एप्रिल रोजी त्या शोधनिबंधाचे सादरीकरण होणार आहे.
लहान मुलांच्या हृदयात असलेले छिद्र बंद करताना वापरलेल्या आधुनिक पद्धतीवर हा शोधनिबंध तयार करण्यात आला असून, त्यासाठी डॉ. चोपडा यांनी ७८ मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. याप्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पद्धतीतही डॉ. चोपडा यांनी बदल केला असून, त्यांनी वेगळ्या प्रकारची छत्री वापरून हृदयात असलेले छिद्र बुजवले. या आधुनिक पद्धतीमुळे शस्त्रक्रियेनंतरही रुग्णांना कोणताही त्रास झाला नसल्याचा दावा डॉ. चोपडा यांनी केला आहे. छत्री बसवल्यानंतर रुग्णांना होणार्‍या त्रासाचे प्रमाण त्यामुळे कमी झाले. केवळ एक दिवसातच रुग्ण चालण्यास सक्षम झाला आणि तीन दिवसात त्याच्या घरी जाऊ दिले गेले. अशा एकूण ७८ लहान मुलांच्या हृदयावर याप्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रिया करताना जांघेतून शुद्ध रक्तवाहिणीतून शुद्ध महाधमनी आणि डावी जवनिका व नंतर उजवी जवनिका असा प्रवास त्या छत्रीचा करण्यात आला. या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात आलेली छत्रीही वेगळ्या पद्धतीची वापरली गेली. रुग्णाच्या वयानुसार त्या छत्रीचा आकार ठरविण्यात आला. या संशोधनावर आधारित शोधनिबंध अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित होणार आहे. या शोधनिबंधाला गौरविण्यात आले असून, त्याच्याच सादरीकरणासाठी दक्षिण कोरिया येथे होणार्‍या संमेलनात डॉ. चोपडा यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
(सदर बातमी श्री. वायकोस साहेबांशी बोलून मग प्रसिद्ध करणे.)