शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चिटफंड : ‘एसआयटी’ची स्थापना

By admin | Updated: May 11, 2014 23:32 IST

सुमारे १0 हजार कोटी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी सीबीआय रविवारी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. या घोटाळ्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

नवीन सिन्हा, नवी दिल्ली
सुमारे १0 हजार कोटी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. 
या घोटाळ्यामुळे पश्‍चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारची डोकेदुखी वाढली आहे. एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी चिटफंड घोटाळा चौकशीचे आदेश सीबीआयला दिले होते. यापूर्वी या घोटाळ्याचा तपास सीआयडी करीत होती तसेच न्यायालयाने संबंधित तिन्ही राज्यांच्या पोलिसांना सीबीआयला सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी आतापावेतो शारदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदीप्ता सेन, तृणमूल काँग्रेसचे खासदार कुणाल घोष आणि या कंपनीच्या काही कर्मचार्‍यांना अटक केली आहे. पश्‍चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि झारखंडमधील सुमारे १५ लाख नागरिकांची बचत बुडल्याचे सुरुवातीच्या चौकशीत उघड झाले आहे. या घोटाळ्यातील बड्या धेंडांना जेरबंद करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या अधिकार्‍यांच्या भूमिकेवर न्यायालयाने सूचक सवाल केला  होता. सीबीआयचे संचालक रंजित सिन्हा लोकमतशी बोलताना म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या प्रकरणाच्या कायदेशीर बाबींवर काम सुरू आहे. त्यानुसार न्यायालयाला माहिती दिली जाईल. सीबीआयला सोमवारी सर्व दस्तऐवज मिळण्याची शक्यता आहे. 
सीबीआयचे अतिरिक्त संचालक आर.के. दत्ता हे एसआयटीचे नेतृत्व करतील. सहसंचालक (पूर्व विभाग) आणि इतर अधिकार्‍यांचा या एसआयटीमध्ये समावेश होणे अपेक्षित आहे. तपासाला गती देण्यासाठी सेबी आणि ईडीच्या अधिकार्‍यांशी  सीबीआय समन्वय साधणार आहे.  पश्‍चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि झारखंड येथील हजारो गुंतवणूकदारांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रारंभी सुमारे १0 हजार कोटी रुपयांचा समजण्यात आलेल्या या घोटाळ्याची व्याप्ती अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे.