शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

1962 च्या युद्धातील चिनी युद्धकैद्याला मायदेशी परतण्याची आस

By admin | Updated: October 25, 2016 17:03 IST

भारतात युद्धकैदी बनून राहत असलेला एक चिनी सैनिक मायदेशात परतण्याची आस बाळगून आहे.

ऑनलाइन लोकमत 
भोपाळ, दि. 25 - युद्धादरम्यान शत्रूसैन्याच्या तावडीत सापडणाऱ्या सैनिकांना अनंत यातना भोगाव्या लागतात. यातील बऱ्याच युद्धकैद्यांना परत मायभूमीत पाऊलही ठेवता येत नाही. 1962 च्या भारत-चीन युद्धात भारताविरुद्ध लढलेला आणि सध्या भारतात युद्धकैदी बनून राहत असलेला असाच एक चिनी सैनिक मायदेशात परतण्याची आस बाळगून आहे. त्यासाठी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मदत करण्याची विनंती केली आहे. 
वँग ची असे या सैनिकाचे नाव असून, तो सध्या मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यात राहत आहे. 1962 च्या चीन युद्धात भारताविरुद्ध लढत असताना या सैनिकाला 1963च्या जानेवारी महिन्यात भारतीय रेड क्रॉसने पकडून भारतीय लष्कराच्या हवाली केले होते. त्यानंतर त्याला पुढील 6 वर्षे उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थान .येथील वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. 1969 साली तुरुंगातून मुक्तता करण्यात आल्यानंतर त्याचे बालाघाट येथील तिरोडी गावात पुनर्वसन करण्यात आले. तेव्हापासून तो येथेच राहत आहे. 
(भारत,चीन युद्धसराव सुरू)
दरम्यान, 77 वर्षीय वॅग ची याला या भागात राज बहादूर या नावाने ओळखले जाते. तसेच येथे त्यांचे परिवारही आहे. मात्र वँग ची गेल्या 53 वर्षांपासून मायदेशात परतण्याची आस बाळगून आहे. चीनमध्ये त्याचे तीन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. अनेक प्रयत्नांनंतर 2013 साली त्याचा चिनी पासपोर्ट जारी झाला होता. पण अद्याप त्याला चीनमध्ये जाता आलेले नाही.  "2014 पासून मी चीनमध्ये जाण्यासाठी भारत आणि चीन सरकारला विनवण्यात करत आहे. पण दोन्ही सरकारांनी माझ्या विनंतीची दखल घेतलेली नाही."  असे वँग म्हणतो. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून  वँग याला खूप अपेक्षा आहेत. त्यांनी चीनमध्ये जाऊन कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी आपणास द्यावी असे वँग म्हणतो.