शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चिनी पाणबुडीची श्रीलंकेत गस्त

By admin | Updated: September 29, 2014 06:05 IST

चिनी पाणबुडी श्रीलंकेच्या कोलंबो येथील लांब किनारपट्टीवर गस्त घालत असल्याचे सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात लक्षात आले

नवी दिल्ली : चिनी पाणबुडी श्रीलंकेच्या कोलंबो येथील लांब किनारपट्टीवर गस्त घालत असल्याचे सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात लक्षात आले असून, त्यामुळे चीनच्या लष्कराची पीएलएची आरमारी वाहिनी हिंदी महासागरात जम बसवित आहे काय? असा संशय भारताला येत आहे. पीएलए- एन (पीपल्स लिबरेशन आर्मी - नेव्ही)आपल्या सागरी सीमा ओलांडून भारतीय सागरी सीमावर अतिक्रमण करण्याच्या तयारीत आहे. चीनच्या युद्धनौका व पाणबुड्या बंगालच्या उपसागरात शिरकाव करतील काय यावर भारतीय आरमार काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे. पण पीएलए-एनची पाणबुडी उघडरित्या भारताच्या परसात आल्याचे मात्र हे पहिलेच उदाहरण आहे. डिझेल- इलेक्ट्रिक टाईप ०३९ साँग क्लास ही चिनी पाणबुडी कोलंबोच्या आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलवर होती. हे टर्मिनल चीनच्या आर्थिक मदतीतूनच उभे राहिले आहे. ७ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत ही पाणबुडी कोलंबो बंदरात दिसली होती. चीनचे अध्यक्ष शी जिपपींग यांच्या श्रीलंकाव मालदीव दौऱ्याचा हा काळ आहे. चीनला जुना सागरी रेशमी मार्ग सुरु करण्याची अत्यंत इच्छा असून, हा मार्ग हिंदी महासागरातून जात असल्याने भारतासाठी ती चिंतेची बाब आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)