शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी सैनिक

By admin | Updated: March 14, 2016 02:52 IST

लद्दाख क्षेत्रात सातत्याने घुसखोरी केल्यानंतर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक आता पाकव्याप्त काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आघाडीच्या लष्करी चौक्यांमध्ये वावरत असल्याचे दिसून आले आहे.

श्रीनगर : लद्दाख क्षेत्रात सातत्याने घुसखोरी केल्यानंतर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) सैनिक आता पाकव्याप्त काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आघाडीच्या लष्करी चौक्यांमध्ये वावरत असल्याचे दिसून आले आहे. या घटनेबद्दल सुरक्षा यंत्रणेने चिंता व्यक्त केली आहे.भारतीय लष्कराने उत्तर काश्मीरच्या नौगाव सेक्टरसमोर असलेल्या आघाडीवरच्या चौक्यांवर पीएलएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बघितले. त्यानंतर पाकिस्तानी सेनेच्या काही अधिकाऱ्यांचे संभाषण पकडण्यात आले, ज्यात चिनी सैनिक नियंत्रण रेषेला लागून असलेल्या प्रांतात काही बांधकाम करताना दिसत आहेत, अशी माहिती या घटनाक्रमाची माहिती ठेवणाऱ्या सूत्रांनी दिली.चिनी सैनिक पाकव्याप्त काश्मीरमध्ये उपस्थित असल्याच्या मुद्द्यावर भारतीय लष्कराने अधिकृतपणे मौन पाळलेले असले तरी आपण विविध गुप्तचर संस्थांना नियंत्रण रेषेवर पीएलए सैनिकांच्या उपस्थितीबद्दल सतत माहिती देत आहोत, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षाच्या अखेरीस पीएलए सैनिकांना तेथे पहिल्यांदाच पाहण्यात आले होते आणि तेव्हापासून तंगधर सेक्टरसमोर या सैनिकांची उपस्थिती दिसत आहे.भारताच्या काही सुरक्षा तज्ज्ञांनी पाकिस्तानी सेनेचे अधिकारी आणि पीएलए अधिकारी यांच्या जवळीकीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.या भागात चिनी सरकारच्या मालकीची चायना गेझौपा ग्रुप कंपनी लिमिटेड ९७० मेगावॉट क्षमतेच्या झेलम-नीलम जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम करीत आहे. हा जलविद्युत प्रकल्प उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा येथे भारतातर्फे तयार केल्या जात असलेल्या किशनगंगा विद्युत प्रकल्पाला प्रत्युत्तर म्हणून स्थापन करण्यात येत आहे. किशनगंगा प्रकल्पाचे काम २००७मध्ये सुरू झाले होते आणि हा प्रकल्प या वर्षी पूर्ण होण्याची आशा आहे.