शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चीनची दादागिरी, भारतात घुसून रोखले कालव्याचे काम

By admin | Updated: November 4, 2016 10:36 IST

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव मोठया प्रमाणावर वाढलेला असताना बुधवारी लडाखमध्ये भारतीय आणि चीनी सैनिक आमने सामने आले.

ऑनलाइन लोकमत 

लेह  दि. ४ - नियंत्रण रेषेवर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव मोठया प्रमाणावर वाढलेला असताना बुधवारी लडाखमध्ये भारतीय आणि चीनी सैनिक आमने सामने आले. लडाखच्या डेमचॉक भागात ग्रामीण रोजगार योजनेतंर्गत सिंचन कालव्याचे बांधकाम सुरु होते. चीनी सैनिकांना या बांधकामाची माहिती मिळताच चीनी सैनिकांनी इथे येऊन हे बांधकाम बंद पाडले.  
 
‘पीपल्स लिबरेशन आमी’चे ५५ जवान लडाखमध्ये घुसले व त्यांनी लवा खणण्याचे काम दादागिरी करून बंद पाडले. लष्कराचे व भारत-तिबेट सीमा पोलिसांचे ७० जवान तेथे धावून गेले आणि त्यांनी चिनी सैनिकांना माघार घेण्यास भाग पाडले. तेव्हापासून दोन्ही बाजूंचे सैनिक लक्ष ठेवून आहेत. 
 
डेमचॉक प्रदेश लेहपासून २५० किमी अंतरावर असून तिबेटच्या सीमेजवळ हा भाग आहे. या विषयावर बोलताना भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिका-याने चीनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली नसल्याचे  म्हटले आहे. हा नियंत्रण रेषेजवळील बांधकाम प्रकल्पाचा मुद्दा असून दोन्ही बाजूंकडून नियंत्रण रेषेजवळ चालणा-या वादग्रस्त बांधकामांवर सीमा अधिका-यांच्या बैठकीत तोडगा काढण्यात येतो असे या अधिका-याने सांगितले. 
 
चीनच्या या आक्रमकतेला दलाई लामा यांच्या अरुणाचल दौ-याची पार्श्वभूमी आहे. भारत सरकारने नुकतीच दलाई लामा यांना अरुणाचलप्रदेशातील तवांग येथे जाण्याची परवानगी दिली आहे. दलाई लामांच्या या दौ-यावर चीनने तीव्र आक्षेप घेतला आहे. संपूर्ण अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे.