शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडीवर बलात्कार; आरोपी अटकेत

By admin | Updated: July 21, 2014 02:21 IST

येथील एका शाळेत सहावर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी अखेर रविवारी एका स्केटिंग प्रशिक्षकास अटक केली

बंगळुरू : येथील एका शाळेत सहावर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी अखेर रविवारी एका स्केटिंग प्रशिक्षकास अटक केली. मुस्तफा असे या आरोपीचे नाव असून त्याच्या मोबाईलमध्ये पीडित मुलीची आक्षेपार्ह छायाचित्रे आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे कर्नाटकच्या राजधानीमध्ये प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला होता.या घटनेविरुद्ध गेले काही दिवस सातत्याने निदर्शने होत होती. त्यामुळे पोलीस यंत्रणेसह सरकारवरील दबाव वाढला होता. बंगळुरूचे पोलीस आयुक्त राघवेंद्र औंधकर यांनी मुख्य आरोपी मुस्तफा याच्या अटकेची आज घोषणा केली. तत्त्पूर्वी आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीनंतर मुख्य आरोपी मुस्तफा (३१) याला अटक करण्यात आली, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रणव मोहंती यांनी सांगितले. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक केली जाऊ शकते, असेही त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. २ जुलै रोजी घडलेल्या व १४ जुलै रोजी उजेडात आलेल्या या भयंकर घटनेतील ही पहिलीच अटक आहे. पोलिसांनी मुस्तफा याच्याकडून एक मोबाईल जप्त केला असून त्यात या चिमुरडीची आक्षेपार्ह छायाचित्रे आढळून आली आहेत, असे औंधकर यांनी सांगितले. मूळचा दरभंगा, बिहार येथील रहिवासी असलेला मुस्तफा गेल्या २० वर्षांपासून बंगळुरूत वास्तव्याला आहे. आरोपीला सोमवारी (दि. २१) न्यायालयात हजर केले जाणार आहे. (वृत्तसंस्था)