शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोट झाल्यास मुलांचा संयुक्त ताबा

By admin | Updated: May 23, 2015 00:14 IST

घटस्फोट झाल्यास मुलांचा ताबा घेण्यावरून माता-पित्यांपैकी एकाला वरचढ ठरविणारी पद्धत संपुष्टात आणत संगोपनाची संयुक्तरीत्या जबाबदारी सोपविण्याची शिफारस विधि आयोगाने केली आहे.

नवी दिल्ली : घटस्फोट झाल्यास मुलांचा ताबा घेण्यावरून माता-पित्यांपैकी एकाला वरचढ ठरविणारी पद्धत संपुष्टात आणत संगोपनाची संयुक्तरीत्या जबाबदारी सोपविण्याची शिफारस विधि आयोगाने केली आहे. बदलत्या काळानुसार संगोपनाची जबाबदारी सोपविण्यासंबंधी कायदे बदलायला हवेत, असे स्पष्ट केले.मुलांच्या ताब्यासंबंधी (कस्टडी लॉ) कायद्याच्या दृष्टीने आयोगाची शिफारस महत्त्वपूर्ण ठरते. कारण भारतात संयुक्त जबाबदारीची कल्पना पूर्णपणे नवी आहे. आई किंवा वडील यापैकी कुणाही एकाला मुलांचा ताबा दिला जाणार नाही. मुलांचे हित पाहून न्यायालयच कुणा एकाला ताबा द्यायचा याबाबत निर्णय घेऊ शकते; अन्यथा संयुक्तरीत्या जबाबदारी सोपविली जावी, असे आयोगाने कायदा मंत्रालयाला सोपविलेल्या अहवालात म्हटले आहे.हिंदू अल्पसंख्याक व पालकत्व कायदा, पालक आणि मुलांसंबंधी कायद्यात बदल करण्याची गरजही आयोगाने अधोरेखित केली. गीता हरिहरन विरुद्ध रिझर्व्ह बँक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अपवादात्मक परिस्थिती वगळता पिता हयात असतानाही माता हीच नैसर्गिक पालक बनू शकते, असा निर्वाळा दिला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)आधुनिक सामाजिक गरजा पाहता कायद्यातही सुधारणा करण्याची गरज आहे. पालकत्व आणि मुलांसंबंधी १८९० च्या कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याची शिफारस करीत आयोगाने नवा अध्याय समोर आणला आहे. या कायद्यात केल्या जाणाऱ्या सुधारणा मुलांच्या ताब्यासंबंधी सर्व प्रक्रियेला तसेच वैयक्तिक कायद्यासाठीही लागू केल्या जाव्यात, असे आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.