शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सचिवांच्या आप्तांकडे नव्या नोटांचे निघाले घबाड

By admin | Updated: December 22, 2016 04:47 IST

तामिळनाडुचे मुख्य सचिव पी. राम मोहन राव यांचे येथील निवासस्थान व त्यांचा मुलगा आणि इतर नातेवाईकांच्या घरांसह

चेन्नई : तामिळनाडुचे मुख्य सचिव पी. राम मोहन राव यांचे येथील निवासस्थान व त्यांचा मुलगा आणि इतर नातेवाईकांच्या घरांसह १२ ठिकाणी बुधवारी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे घालून झडती घेतली. पहाटे साडेपाचच्या सुमारास ही कारवाई सुरू झाली. त्यांचा मुलगा आणि नातेवाईकांकडून १८ लाख रुपये किंमतीच्या नव्या नोटा आणि दोन किलो साने सापडले. येथील अनेक सरकारी अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. यापूर्वी प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी शेखर रेड्डी यांच्या निवासस्थानी व आस्थापनांवर छापे मारून ३४ कोटींच्या नव्या नोटांसह १५४ कोटी रुपये रोख आणि १६७ किलो सोने इतका ऐवज हस्तगत केला होता. शेखर रेड्डी यांना आज अटक करण्यात आली. शेखर रेड्डी यांचे आणि राम मोहन राव यांच्याशी संबंध असल्याचे बोलले जाते. राव यांचा मुलगा व त्यांच्या नातेवाईकांनी कर चुकवेगिरी केल्याशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. राव यांच्या निवासस्थानी २०-२० अधिकाऱ्यांच्या दोन तुकड्यांनी छापे घातले. तामिळनाडू आणि शेजारच्या आंध्र प्रदेशातील राव तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित अनेक ठिकाणांची प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. राव यांची यावर्षी जून महिन्यात अखिल भारतीय अण्णा द्रमुक सरकारने मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती. (वृत्तसंस्था)ही कारवाई सूडाची-तमिळनाडुचे मुख्य सचिव रामा मोहन राव यांच्या निवासस्थानी प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यांबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर बुधवारी जोरदार टीका केली. ही कारवाई सूडबुद्धीची, अनैतिक व तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या.